ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह असल्याचं उघड

हिमानी नरवाल भारत जोडो यात्रेत सहभाग, अनेक काँग्रेस नेत्यांसोबत काम

हरियाणा : हरियाणाच्या रोहतकमध्ये एका सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांचा हा मृतदेह असल्याचं उघड झालं आहे. सुटकेसमध्ये हिमानी यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. हिमानी या भारत जोडो यात्रेत हरयाणवी पेहरावात सहभागी जाल्या होत्या. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत फोटोही काढला होता. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केला होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांनी रोहतकमध्ये दीपेंद्र हुड्डा आणि भूपेंद्र हुड्डा यांच्यासाठी प्रचारही केला होता. मात्र, त्यांची हत्या झाल्याचं ऐकून हरियाणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे आमदार बीबी बत्रा यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सांपला येथून जाणाऱ्या फ्लायओव्हर जवळ आज सकाळी एका बंद सुटकेसमध्ये हाताला मेहंदी असलेल्या तरुणीचा मृतदेह मिळाला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. त्यावेळी या तरुणीची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. तसेच मृतदेहाची ओळख पटावी म्हणून रोहतक पीजीआयमध्ये तिचा मृतदेह ठेवला.

हेही वाचा –  विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय !

आमचीच कार्यकर्ती
मात्र, आता काँग्रेसचे आमदार भारत भूषण बत्रा यांनी ही युवती काँग्रेसची सक्रिय कार्यकर्ती असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसह तिने काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या प्रचारसभेत भाग घेतला होता, अशी माहिती बत्रा यांनी दिली. तसेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

तरुणी लग्न सोहळ्यात
यावेळी बत्रा यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोसळली आहे. त्यामुळे आता सरकारने आरोपींच्या मनात दहशत निर्माण केली पाहिजे. आरोपींनी गुन्हे करू नये म्हणून सरकारने वचक दाखवला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर, हिमानीने एक दिवस आधी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ एका लग्न सोहळ्यातील असून ती या लग्न सोहळ्यात दिसत आहे.

आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास सांपला येथून जाणाऱ्या एका फ्लायओव्हर जवळ एक सुटकेस सापडली. त्यात मृतदेह होता. त्यातच हा मृतदेह काँग्रेसच्या महिला नेत्याचा असल्याने पत्रकारांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. मात्र पोलीस उत्तरे देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यातच आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी होताना दिसत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button