पिंपरी / चिंचवड

विधवा माता भगिनींनी भरली महालक्ष्मीची ओटी

शिवजयंती निमित्ताने विजेता फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम

पिंपरी l प्रतिनिधी

विजेता फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. अॅड. श्वेता विजय इंगळे – सरकार ह्यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून काटेपुरम चौक, कृष्णा चौक, क्रांती चौक अशी पदयात्रा काढली व ह्या पदयात्रेची सांगता सांगवी येथील महालक्ष्मी मंदीरात विधवा माता – भगिनींकडून महालक्ष्मीची ओटी भरून केली.

डॉ. अॅड. श्वेता विजय इंगळे – सरकार म्हणाल्या, प्रत्येक विधवा आणि घटस्फोटित स्त्रीला स्वतः सक्षम होण्याची गरज आहे. कारण नवऱ्याच्या मृत्यूने विधवा झालेल्या स्त्रीला अनेक चालीरीती व रूढीपरंपरेच्या नावाखाली सन्मानित करण्याचे तर सोडूनच द्या; पण, तिला साधा मानसिक आधारही मिळत नाही. उलट चालीरितींच्या नावाखाली तिच्यामध्ये देवी – देवतांच्या नावावर भिती निर्माण केली जाते. तिला धार्मिक कार्यांपासून वंचित ठेवले जाते. वंचित आणि उपेक्षित घटकाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून अनेकांनी संघर्ष केला आहे. स्वराज्य आणि स्वातंत्र्याचा इतिहास असणाऱ्या भारताची मी ही एक सुशिक्षित नागरिक आहे म्हणून महिलांच्या ह्या अधिकारासाठी मी ही हा वसा उचलला आहे.

काही दिवसांवर महिला दिन आला असताना आजचाच दिवस ह्यासाठी का निवडला..? हे सांगताना डॉ. श्वेता इंगळे म्हणाल्या की, हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच मावळे घेऊन शिवरायांनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली; तशीच मी ही आई भवानीसमोर आज विधवा माता-भगिनींकडून तिची ओटी भरून स्त्रीयांच्या स्वाभिमान, आत्मसन्मान आणि सबलीकरणासाठी शपथ घेतली. “शिवरायांची हिरकणी मी, सावित्रीची लेखणी मी…!” स्त्री सबलीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी अनेक कायदे आले त्याचे फायदेही झाले आणि गैरफायदेही घेतले गेले पण खरच स्त्री आजही सबल आणि सक्षम झाली का…! हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. म्हणून निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मीच स्वतः शिवरायांची हिरकणी आहे आणि कोणी कितीही विरोध केला तरीही मी माझ्यातले आत्मबल ढासळू देणार नाही हा वसा सावित्रीच्या लेखणीतून जोपासला तर प्रत्येक महिला, माता-भगिनी सक्षम होईल तिच्या कलागुण क्षेत्रात सबल होईल असा मला दृढ विश्वास आहे.

महिलांनी महालक्ष्मीच्या मंदीरात “शिवरायांची हिरकणी मी….! सावित्रीची लेखणी मी….!”; “जय भवानी…! जय शिवाजी…!” आणि “हर हर महादेव…!” अशा घोषणा दिल्या. यावेळी लता सारगे, सुनंदा म्हेत्रे ह्या ओटी भरणाऱ्या महिलांनी स्वतःतल्या स्त्री शक्तीला जागृत करताना श्वेता इंगळे सरकार यांचा आधार मिळाला. आता आम्ही कुठेही डगमगणार नाही असे वक्तव्य करून, समाधान व्यक्त केले. यावेळी विजेता मराठी उद्योजक मंचच्या पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष मनिषा बिरादार, भारती कुचेकर, रीना किसार, सविता पवार आदी महिला उपस्थित होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button