ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

परभणी जिल्ह्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना

प्रेम विवाहास विरोध करत पोटच्या मुलीला ठार मारले

परभणी ः जिल्ह्यातील पालम तालुक्यातील नाव्हा येथील १९ वर्षीय युवतीचे गावातील दुसऱ्या जातीतील युवकासोबत प्रेम संबंध होते. मुलीने आंतरजातीय विवाह करू नये म्हणून पालकांनी विरोध केला. तरी देखील तरुणी लग्न करण्यावर ठाम होती.तालुक्यामधील नाव्हा या गावात ऑनर किलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलीचे गावातील अन्य जातीच्या मुलासोबत प्रेम होते. संबंधित मुलीने आपल्या प्रियकरासोबत प्रेम विवाह करण्याचा निश्चय केला. मात्र पालकांनी प्रेम विवाहाला विरोध करत पोटच्या मुलीला ठार करून भावकीतील निवडक व्यक्तींनासोबत घेत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर एकूण आठ जणांवर खून, पुरावा नष्ट करणे या कलमाखाली पालम पोलीसात ३ मे रोजी गुन्हा नोंद झाला आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, २१ एप्रिल २०२४ रोजी रात्री १० ते २२ एप्रिलच्या दरम्यान नाव्हा येथे तरुणीच्या आई वडीलांनी तरुणीला ठार केले. त्याच रात्री कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक व्यक्तीना सोबत घेऊन संगनमत करत तरुणीचा मृतदेह नाव्हा येथील स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट केला.

सदर घटना पुढे आल्यानंतर पालम पोलीसात पोनि. रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत तरुणीचे आई, वडील आणि भावकीतील इतर सहाजण अशा एकूण आठ जणांवर पालम पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहेत. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button