breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पंढरपुरात बडव्यांनी स्वतंत्र उभारले श्री विठ्ठलाचे मंदिर

पंढरपूर –  पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिृणी मंदिरातील बडव्याची 2014 पासून उपासना झाल्याने बडव्यांनी स्वतंत्र विठ्ठल मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा करीत मंदिराची स्थापना केल्याचे समजते आहे. त्यामुळे बडव्यांचा वाद पुन्हा एकदा उफाळून येणार आहे.

लाखो वारक-याचं श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरात बडव्यांची बंडखोरी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. पंढरपुरातील समस्त बडवे समाजाने श्री विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे. पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे. पांडुरंग कृष्णाजी बडवे यांच्या घराजवळ समस्त बडवे समाजाने विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे.

पंढरपुरातील समस्त बडवे समाजाचा विठ्ठल रुक्मृिणी मंदिराचा ताबा केल्याने 15 जानेवारी 2014 पासून त्यांची सेवा खंडीत झाली. शासनाने मंदिर समितीने पगार पुजारी ठेवून विठ्ठल रुक्मिृणीची पुजा-अर्चा सुरु केलीय, त्यामुळे मंदिराची उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी स्वतंत्र विठ्ठल मंदिरची स्थापना करण्यात आली आहे.

पंढरपूरमध्ये बाबासाहेब बडवे यांनी बांधलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराचा ताबा गेल्यानंतर बडवे यांनी वेगळे विठ्ठल मंदिर उभारल्याचे समजते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button