पिंपरी / चिंचवड

स्पा सेंटर चालकाकडे खंडणीची मागणी; पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या खंडणीखोरावर आणखी एक गुन्हा

पिंपरी l प्रतिनिधी

एका बहाद्दराने पोलीस असल्याचे सांगून स्पा सेंटर चालकाकडे खंडणीची मागणी केली. याप्रकरणी खंडणीखोरावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आरोपीवर मागील दोन दिवसांपूर्वी वाकड पोलीस ठाण्यात देखील अशाच प्रकारे स्पा सेंटर चालकाकडून खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

विशाल कैलास जोंजळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल अनिल कदम (वय 24, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे  पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटर चालवतात. मी पोलीस आहे, असे सांगून तसेच घाईघाईने ओळखपत्र दाखवत आरोपीने फिर्यादी यांच्याकडे स्पा मसाज सेंटरमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कार्यवाही न करण्यासाठी 30 हजार रुपये रोख रकमेची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याच्याकडे असलेले व्हिडिओ शूटिंग व्हायरल करून फिर्यादी काम करत असलेल्या स्पा मसाज सेंटरची व स्पा मसाज सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलींची बदनामी करेन, अशी आरोपीने धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीकडून पाच हजार रुपये रोख रक्कम घेऊन उर्वरित 25 हजार रुपयांची मागणी आरोपीने केली‌. पैसे दिले नाही तर पोलिसांना सांगून कारवाई करण्याची व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने खंडणी मागितली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

आरोपी जोंजळे याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे आणखी एका स्पा सेंटर चालकाकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button