breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने शिवसेना आमदाराची भावाच्या बायकोला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

औरंगाबाद |

औरंगाबादमधील सटाणा येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते गुरुवारी भाजपा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे पतीसोबत हजर होत्या. यावेळी त्यांनी डॉ भागवत कराड व माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांचा सत्कार केला. मात्र हा सत्कार बोरनारे कुटुंबीयांच्या जिव्हारी लागला. हाच राग मनात धरून आमदार बोरनारे यांच्या कुटुंबीयांनी जयश्री बोरनारे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केलं. तसंच शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आमदार बोरनारे स्वतः या मारहाणीत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे जयश्री बोरनारे गोदावरी कॉलनीत एका नातेवाईकांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमात पतीसोबत सहभागी झाल्या होत्या. भर कार्यक्रमातच त्यांना बोरनारे कुटुंबातील १० जणांनी जबर मारहाण केली. त्यांच्या पतीलादेखील मारहाण करण्यात आली आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. “शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेली? असं म्हणत महिलेला बेदम मारहाण केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु, कोणतीही कारवाई झाली नाही. उलट पिडीतेवरचं ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर महिलाधोरणकर्ते काही बोलणार का ? अजून किती बलात्कारी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाचवणार आहात?,” असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे. महाराज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता. हे सरकार गोरगरीबांचं धार्जीणं नाही तर सरकारचे कलाकारी मंत्री आमदार खासदार व त्यांच्या बगलबच्चे धार्जीणं आहे, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button