breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

लोकसभा निवडणूक रणसंग्राम : अजित पवार अन् एकनाथ शिंदेंच्या काही उमेदवारांना कमळावर निवडणुक लढवावी लागणार!

मुंबईतील बैठकी मोठी खलबंत : अजित पवारांसह नेते अमित शहांच्या भेटीला

मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून लोकसभेच्या जागावाटपात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच आलेल्या माहितीनुसार राज्यातील ४८ पैकी ३२ जागा भाजप लढवू शकतो. तर शिंदेंच्या शिवसेनेला १० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त दोन ते तीन जागा सोडल्या जाऊ शकतात. अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटात एकच खळबळ उडाली असून बैठक अपुरी सोडून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांसह अमित शाह यांच्या भेटीला निघाल्याची माहिती समोर आली आहे.

गृहमंत्री अमित शाहांनी सह्याद्री अतिथी गृहावर देवेंद्र फडणवी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. त्यात जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. सर्वात आधी अमित शहांनी फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली. ही बैठक अर्धा तास चालली. त्यानंतर दोन्ही नेते अतिथी गृहावरून निघाले. त्यानंतर अमित शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी ४५ मिनिटं चर्चा केली. यानुसार शिंदे आणि अजित पवार गट ज्या जागा जिंकू शकतात. त्याच त्यांना देण्यात येतील. काही जागांची अदलाबदल होईल. गरज पडल्यास शिंदे, अजित पवारांच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवाव्या लागतील, अशी चर्चा बैठकांमध्ये झाली आहे.

हेही वाचा  – लोकसभा निवडणूक रणसंग्राम : भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला; राष्ट्रवादी व शिवसेनेला मोजक्या जागा!

दरम्यान, भाजपने गेल्या निवडणुकीत भाजप सेना युतीत २५ जागा लढवल्या होत्या. आता महायुतीत भाजप ३२ जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. यामुळे शिंदेंसोबत गेलेल्या १३ खासदारापैंकी फक्त १० खासदारांना पुन्हा निवडणुक लढवावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटात सध्या एकच खासदार असून त्यांना अजून दोन ते तीन जागा देण्यात येणार आहेत. यातच मित्रपतक्षांच्या उमेदवारांना कमळावर लढण्यास भाजपकडून सांगण्यात येऊ शकतात. असेही चर्चा सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button