breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्रजासत्ताक दिनानिमित्त निगडीत राष्ट्रभक्तीचा ‘जागर’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी निगडीतील भक्तीशक्ती चौक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा भव्य कार्यक्रम “झंडा उंचा रहे हमारा” आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे, यांच्या हस्ते रविवारी सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, पिं.चि. नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती–शक्ती चौक येथे १६० मीटर इतक्या उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आलेला आहे. दरवर्षी या ठिकाणी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यावेळी मोठ्या लोकसंख्येने नागरिक उपस्थित असतात. यावेळेस नाशिक येथील सुप्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल व त्यांचे सहकारी महेश गायकवाड, पृथ्वीराज इंगळे हे देशभक्तीपर गीतांचा “झंडा उंचा रहे हमारा” हा भव्य कार्यक्रम सादर करणार आहेत. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या लोकप्रिय मालिकेचे शिर्षक गीत गायक संदीप उबाळे हे आपली कला सादर करणार आहेत. काल झालेल्या स्थायी समिती सभेत या कार्यक्रमासाठी येणाऱ्या खर्चास सभापती विलास मडिगेरी यांनी मान्यता दिलेली आहे. तसेच, या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button