breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

लोकसभा निवडणूक रणसंग्राम : भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला; राष्ट्रवादी व शिवसेनेला मोजक्या जागा!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बैठक सोडली; अमित शहांच्या भेटीसाठी रवाना?

मुंबई | केंद्रीय मंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून लोकसभेच्या जागावाटपात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच आलेल्या माहितीनुसार राज्यातील ४८ पैकी ३२ जागा भाजप लढवू शकतो. तर शिंदेंच्या शिवसेनेला १० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त दोन ते तीन जागा सोडल्या जाऊ शकतात. अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटात एकच खळबळ उडाली असून बैठक अपुरी सोडून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांसह अमित शाह यांच्या भेटीला निघाल्याची माहिती समोर आली आहे.

गृहमंत्री अमित शाहांनी सह्याद्री अतिथी गृहावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. त्यात जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. सर्वात आधी अमित शहांनी फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली. ही बैठक अर्धा तास चालली. त्यानंतर दोन्ही नेते अतिथी गृहावरून निघाले. त्यानंतर अमित शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी ४५ मिनिटं चर्चा केली. यानुसार शिंदे आणि अजित पवार गट ज्या जागा जिंकू शकतात. त्याच त्यांना देण्यात येतील. काही जागांची अदलाबदल होईल. गरज पडल्यास शिंदे, अजित पवारांच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवाव्या लागतील, अशी चर्चा बैठकांमध्ये झाली आहे.

दरम्यान, भाजपने गेल्या निवडणुकीत भाजप सेना युतीत २५ जागा लढवल्या होत्या. आता महायुतीत भाजप ३२ जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. यामुळे शिंदेंसोबत गेलेल्या १३ खासदारापैंकी फक्त १० खासदारांना पुन्हा निवडणुक लढवावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटात सध्या एकच खासदार असून त्यांना अजून दोन ते तीन जागा देण्यात येणार आहेत. यातच मित्रपतक्षांच्या उमेदवारांना कमळावर लढण्यास भाजपकडून सांगण्यात येऊ शकतात. असेही चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा    –      ‘म्हाडा’च्या प्रकल्पातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घेणार : शिवाजीराव आढळराव पाटील 

लोकसभेसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी

१. नंदुरबार : हीना गावित (विद्यमान खासदार) किंवा विजयकुमार गावित

२. धुळे : सुभाष भामरे यांच्याऐवजी प्रताप दिघावकर यांना उमेदवारीची शक्यता

३. जळगाव : उन्मेष पाटील (विद्यमान खासदार) किंवा ए टी नाना पाटील

४. रावेर : रक्षा खडसे यांच्याऐवजी अमोल जावळे यांच्या नावाची चर्चा

५. अकोला : संजय धोत्रे (विद्यमान खासदार)

६. नागपूर : नितीन गडकरी (विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री)

७. भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे (विद्यमान खासदार)

८. गडचिरोली : अशोक नेते यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम भाजपच्या चिन्हावर लढण्याची चर्चा

९. नांदेड : प्रताप पाटील चिखलीकर यांच्याऐवजी मिनल खतगावकर

१०. जालना : रावसाहेब दानवे (विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री)

११. दिंडोरी : भारती पवार (विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री)

१२. भिवंडी : कपिल पाटील (विद्यमान खासदार)

१३. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उमेदवारीची शक्यता

१४. उत्तर मध्य मुंबई : पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांच्या उमेदवारीची चर्चा

१५. ईशान्य मुंबई : मनोज कोटक (विद्यमान खासदार)

१६. पुणे : गिरीश बापट यांच्या निधनानंतर मुरलीधर मोहोळ

१७. अहमदनगर : सुजय विखे पाटील यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील किंवा राम शिंदे

१८. बीड : प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भगिनी पंकजा मुंडे

१९. सोलापूर : जयसिद्धेवर स्वामी यांच्याऐवजी अमर साबळेंच्या नावाची चर्चा

२०. माढा : रणजितसिंह निंबाळकर (विद्यमान खासदार)

१. सांगली : संजयकाका पाटील यांच्याऐवजी विशाल पाटील भाजपप्रवेश करुन लढण्याची चर्चा

२२. वर्धा : रामदास तडस (विद्यमान खासदार) यांची उमेदवारी निश्चित नाही

२३. लातूर : सुधाकर शृंगारे (विद्यमान खासदार) यांची उमेदवारी निश्चित नाहीयुतीतील भाजपच्या पारंपरिक जागा बारामती : राष्ट्रवादीला जागा सोडण्याची चिन्हं (जागा सध्या पवार गटाकडे)

२४. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा (जागा सध्या काँग्रेसकडे, मात्र धानोरकरांच्या निधनाने रिक्त)

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडील विद्यमान जागा

२५. हिंगोली : विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या जागेवर भाजपकडून तानाजी मुरकुटे यांच्या उमेदवारीची चर्चा

२६. कोल्हापूर : विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या जागेसाठी भाजप इच्छुक

२७. पालघर : विद्यमान खासदार राजेंद्र गावित भाजपात घरवापसी करुन लढण्याची शक्यता

युतीत शिवसेनेकडे असलेल्या पारंपरिक जागा

२८. ठाणे : डॉ. संजीव नाईक (जागा सध्या ठाकरे गटाकडे)

२९. धाराशिव : बसवराज पाटील (जागा सध्या ठाकरे गटाकडे)

३०. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे (जागा सध्या ठाकरे गटाकडे) शिंदेंकडून किरण सामंत इच्छुक

३१. छत्रपती संभाजीनगर : अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (जागा सध्या एमआयएमकडे)

३२. अमरावती : नवनीत राणा (विद्यमान अपक्ष खासदार) राणांचा भाजपप्रवेश होण्याची चर्चा, मात्र शिंदेंकडून आनंदराव अडसूळ इच्छुक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button