breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

Good News: कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या ‘त्या’ औषधाच्या भारतात सुरु झाल्या चाचण्या

अ‍ॅंटीव्हायरल ड्रग फॅव्हीपीरावीर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या भारतात सुरु झाल्या आहेत अशी माहिती ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेडने मंगळवारी दिली. फॅव्हीपीरावीर हे करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या औषधांपैकी एक आहे. एप्रिल महिन्यात भारतातील औषध नियमन करणाऱ्या संस्थेकडून फॅव्हीपीरावीर औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांना परवानगी मिळाली होती. 

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिलेल्या परवानगीमुळे Covid-19 च्या रुग्णांवर औषधाची चाचणी घेण्याची परवानगी मिळालेली आपण पहिली कंपनी ठरल्याचे ग्लेनमार्ककडून सांगण्यात आले. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. जपानमध्ये ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर करण्याची २०१४ मध्ये परवानगी देण्यात आली.

“भारतात फॅव्हीपीरावीर औषधाच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. दहा किंवा त्यापेक्षा जास्त सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर या चाचण्या घेण्यात येतील. जुलै-ऑगस्टपर्यंत या चाचण्यांचे निष्कर्ष समोर येतील” असे ग्लेनमार्ककडून सांगण्यात आले. “फॅव्हीपीरावीर औषधाचा रुग्णावर नेमका काय परिणाम होतो. त्याची वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना उत्सुक्ता आहे. सध्या करोना व्हायरसवर प्रभावी औषध नाहीय. त्यामुळे या चाचण्यांचा निष्कर्ष महत्वपूर्ण असणार आहे” असे डॉ. मोनिका टंडन यांनी बीएसई फायलिंगमध्ये म्हटले आहे. त्या कंपनीच्या उपाध्यक्ष आणि क्लिनिकल डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख आहेत. भारतात सध्या करोना व्हायरसचे ७०,७५६ रुग्ण आहेत. २२९३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button