breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

मावळमध्ये ‘मी महायुतीचा उमेदवार असेल’; खासदार श्रीरंग बारणे

लोकसभा निवडणूक रणसंग्राम : कोणत्या चिन्हावर लढणार संदिग्धता कायम

पुणे : मावळ लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल यावरून तर्कवितर्क लढवले जातायेत, असं असतानाच शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी मी महायुतीचा उमेदवार असेल, असं ठामपणे म्हटलंय. पण कमळावर लढणार की धनुष्यबाणावर? यावर ही त्यांनी मी महायुतीचा उमेदवार असेल असं म्हणत बारणेंनी संदिग्धता कायम ठेवली आहे. बारणेंच्या उमेदवारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपने ही विरोध दर्शविला आहे.

पिंपरी भाजपने कमळावरचा उमेदवार असायला हवा, मग बारणे असले तरी आमची हरकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यालाच अनुषंगाने बारणे भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा मावळ लोकसभेत सुरू होती. अशातच मी महायुतीचा उमेदवार असेन, असं म्हणत बारणेंनी आणखी संदिग्धता वाढवली आहे.

हेही वाचा – लोकसभा निवडणूक रणसंग्राम : भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला; राष्ट्रवादी व शिवसेनेला मोजक्या जागा!

मावळमधील महायुतीचा उमेदवार कोण असेल असं विचारल्यावर श्रीरंग बारणे ठामपणे म्हणाले की, मावळ लोकसभेचा महायुतीचा उमेदवार मीच असेल. महायुतीकडून भाजप, शिवसेनेसोबत सहभागी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे अजित पवार या महायुतीच्या घटकपक्षांचा उमेदवार काही दिवसातच स्पष्ट होईल. त्यात महायुतीचा उमेदवार मीच असेल.

सुनिल शेळकेंचा बारणेंना विरोध

कमळाच्या चिन्हावर बारणे उमेदवार असतील, तर आमची हरकत नसेल, असं भाजपचे पदाधिकारी म्हणाले होते, पण मावळ लोकसभेतून बारणेंना उमेदवारी का देऊ नये हे सुचविणारा एक अहवालच आमदार शेळके यांनी तयार केला आहे. तो अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्यात आला आहे. त्याचाच दाखला देत, मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी यावर आमदार शेळके ठाम आहेत. त्यांनी बारणेंना स्पष्ट विरोध केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button