breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेकडून तालिबानी बंडखोरांना नोकरीच्या संधी?

नव्या अफगाणिस्तानात पुनर्वसन करण्यासाठी योजना

अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेत तालिबानला सहभागी करून घेण्यास अमेरिका उत्सुक असून, तो बंडखोरांना नोकऱ्यांच्या संधीसह सुरक्षिततेची हमी देत आहे, असे एका माध्यमाच्या वृत्तात म्हटले आहे.

तालिबानला अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिका, पाकिस्तान, चीन, रशिया व इतर जागतिक शक्ती प्रयत्न करत असतानाच, अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही तालिबानी बंडखोरांचे नव्या अफगाणिस्तानात पुनर्वसन करण्यासाठी योजना आखली असल्याचे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे.

तालिबानने अफगाणिस्तातील शांतता प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी त्यांचे मन वळवण्यास उत्सुक असलेल्या अमेरिकेने त्यांना बंडखोरांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासह सुरक्षिततेचे जाळे निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला आहे, असेही या वृत्तात म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फौजा माघारी घेण्याचे सुतोवाच केले असले तरी, तालिबानला शांतता बोलण्यात सहभागी होण्यास भाग पाडण्याकरिता तेथे पुरेशा संख्येत फौजा ठेवाव्यात असे पेंटॅगॉनचे मत आहे. अशा प्रकारे फौजांचा नेमका वापर केल्यानेच तालिबानला गेल्या जून महिन्यात ईद-उल-फित्रच्या वेळी शस्त्रसंधी मान्य करणे भाग पडले होते, याकडे पेंटॅगॉनने लक्ष वेधले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button