breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

Live Update : शिरूरमध्ये अमोल कोल्हे 33 हजार मतांनी आघाडीवर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिरुर लोकसभा मतदार संघात सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये धक्कादायक निकाल पहायला मिळला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी कडवी टक्कर देत आघाडी घेतली आहे. प्रचारापासून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेत आढळरावांना कडवं आव्हान दिलं होतं. सध्या अमोल कोल्हे 33 हजार 99 मतांनी आघाडीवर आहेत. कोल्हे यांना 355528 मते मिळाली आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील यांना 322429 मते मिळाली आहेत.

पहिल्या दोन फेऱ्यांनंतर अमोल कोल्हे यांनी अंदाजे १४ ते १५ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली होती. अमोल कोल्हेंविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी पुण्यामध्ये राष्ट्रवादीने शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमबाहेर अमोल कोल्हेंचा भावी खासदार असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत. जुन्नर तालुक्यामधील राष्ट्रवादीच्या युवा मंचचे अध्यक्ष अतुल बेनके यांनी हे बॅनर लावले आहेत.

शिरूर मतदार संघावर शिवाजीराव आढळराव पाटील यांची चांगली पकड असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. कारण अमोल कोल्हे यांचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button