breaking-newsमनोरंजन

‘बिग बॉस’च्या घरात रंगली नळावरची भांडण

बिग बॉसच्या घरात कोणते टास्क दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष असते. बिग बॉसने ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या नवीन टास्कची घोषणा केली. सकाळी उठल्यानंतर घरातील कोणत्याच नळाला पाणी येत नसल्याचं सदस्यांच्या लक्षात आलं, त्यानंतर घरातील सदस्यांना पाण्याचे महत्त्व समजावे यासाठी ‘थेंबे थेंबे तळे साचे’ हा टास्क देण्यात येत असल्याचं बिग बॉसने सांगितलं. या टास्कसाठी घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली.

एका गटात सई, मेघा, ऋतुजा, पुष्कर, उषा, आस्ताद यांचा समावेश आहे, तर दुसरा गट रेशम, राजेश, जुई, भुषण, सुशांत यांचा आहे. या दोन्ही गटांना दोन रिकाम्या टाक्या देण्यात आल्या आहेत. गार्डन परिसरात एक नळ बसवण्यात आला आहे. या नळाला पाणी आल्यानंतर दोन्ही गटातील सदस्यांना बादलीच्या साहाय्यानं या टाकीत पाणी भरायचे आहे आणि दैनंदिन कार्यासाठी पाणी लागल्यास याच टाकीतील पाणी वापरणे अनिवार्य असणार आहे. नळाला पाणी थोड्याच वेळासाठी सोडण्यात येत असून सदस्यांना त्या कालावधीतच जास्ती जास्त पाणी भरणे अपेक्षित असल्यानं कालच्या भागात पाण्यासाठी दोन्ही गटात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button