breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Live update : मावळात श्रीरंग बारणे आघाडीवर तर पार्थ पवार पिछाडीवर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे  यांच्यात लढत झाली आहे. मतमोजनीत पार्थ पवार पिछाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना 165251 मतांनी आघाडी मिळाली आहे. बारणे यांना 527715 तर पार्थ पवार यांना 362464 मते मिळाली आहेत. पार्थ पवार पिछाडीवर आहेत. बारणे यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे.

मावळ मतदारसंघात शिवसेनेचंच वर्चस्व कायम राहिले आहे. यावेळी पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या मतदार संघात काय निकाल लागतो याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून आपली उमेदवारी माघारी घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी दिली होती.

मावळात अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना राष्ट्रवादीने रिंगणात उतरवून चुरस निर्माण केली. पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष मावळच्या लढतीकडे लागले होते. शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात होते. तर, पार्थ आयुष्यातील पहिल्या निवडणुकीला सामोरे गेले. सुमारे २३ लाख मतदारसंख्या असलेल्या मावळसाठी ५९.४९ टक्के मतदान झाले. बारणे आणि पवार यांच्या मुख्य लढतीत वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील किती मते घेतात, यावर मावळच्या विजयाचे बरेचसे गणित अवलंबून असणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल २२ लाख ९७ हजार ४०५ मतदार असून हे मतदार मावळचा खासदार कोण, हे ठरवणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ रायगड, तर उर्वरित तीन पुणे जिल्ह्य़ातील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button