“सिंधू पाणी कराराबाबत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांनी आम्हाला दोष देऊ नये” ; पाकिस्तानला भारताने फटकारले

Indus Water Treaty : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जागतिक व्यासपीठावर भारतावर सिंधू पाणी करार निलंबित केल्याचा आरोप केला. त्यानंतर आता भारताने यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताने पाकिस्तानच्या आरोपावर बोलताना, पाकिस्तानने सिंधू पाणी कराराचे उल्लंघन केल्याबद्दल आम्हाला दोष देणे थांबवावे कारण सीमापार दहशतवाद करार सुरू ठेवण्यात अडथळे निर्माण करत आहे.
ताजिकिस्तानमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हिमनदी संवर्धन परिषदेत, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या या कराराला निलंबित करण्याच्या निर्णयाला पाण्याचे शस्त्र तसेच एकतर्फी आणि बेकायदेशीर म्हटले होते. शाहबाज म्हणाले की लाखो लोकांचे जीवन संकुचित राजकीय हितसंबंधांसाठी ओलीस ठेवू नये.
केंद्रीय मंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की पाकिस्तान स्वतः दहशतवादाद्वारे कराराचे उल्लंघन करत आहे. ते म्हणाले, ‘पाकिस्तानने व्यासपीठाचा गैरवापर करून असे मुद्दे उपस्थित करणे चुकीचे आहे जे व्यासपीठाच्या कक्षेत येत नाहीत. आम्ही या प्रयत्नाचा तीव्र निषेध करतो.’
हेही वाचा – अजित पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी सोडली साथ; सत्ताधारी पक्षात झाले सामील
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार निलंबित केला. भारताचे म्हणणे आहे की सिंधूचे पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा धर्म विचारून मृत्यू झाला.
कीर्तीवर्धन सिंह म्हणाले की, करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, तांत्रिक, लोकसंख्याशास्त्रीय आणि हवामान बदल तसेच सीमापार दहशतवादाच्या धोक्यामुळे परिस्थिती बदलली आहे. ते म्हणाले, ‘पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळे भारताला कराराचा फायदा घेण्यास अडथळा निर्माण झाला आहे. पाकिस्तानने भारताला दोष देणे थांबवावे.’ ते म्हणाले की, सिंधू पाणी करार सद्भावना आणि मैत्रीच्या भावनेने करण्यात आला आहे आणि त्याचा आदर करणे आवश्यक आहे. त्यांनी स्पष्ट केले की कराराचे उल्लंघन करणारा पक्ष पाकिस्तानच आहे, जो वाद वाढवत आहे.