Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘ऑपरेशन सिंदूर हे नारीशक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक’;  पंतप्रधान नरेंद्र मोदी

भोपाळ : ऑपरेशन सिंदूर हे आपल्या नारीशक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक बनले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, या ऑपरेशनमध्ये बीएसएफने खूप मोठी भूमिका बजावली आहे. बीएसएफच्या मुली काश्मीरपासून गुजरातपर्यंत जबाबदारी घेत होत्या. त्यांनी सीमेपलीकडून होणा-या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आहे. बीएसएफच्या शूर कन्यांनी अद्भुत शौर्य दाखवले आहे. संपूर्ण जग मुलींचे शौर्य पाहत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सक्षमीकरण महासंमेलनात सहभागी झाले. यावेळी त्‍यांच्‍या हस्‍ते अनेक प्रकल्पांची सुरुवात केली. याच दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धचे सर्वात मोठे ऑपरेशन आहे. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.

हेही वाचा –  कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती; जलविद्युत निर्मितीतून राज्याला 144 कोटींचा थेट लाभ

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचे रक्त सांडले नाही तर त्यांनी आपल्या संस्कृतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आमच्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी भारताच्या नारीशक्तीला आव्हान दिले आहे. हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या आकांसाठी काळ ठरले आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इतिहासातील दहशतवाद्यांविरुद्धचे सर्वात मोठ आणि सर्वात यशस्वी ऑपरेशन आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

आता आम्ही घरात घुसूनही मारू आणि दहशतवाद्यांना मदत करणा-यांनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. भारतातील प्रत्येक नागरिक म्हणत आहे की, जर तुम्ही गोळी झाडली तर गोळीचे उत्तर गोळीनेच दिले जाईल.पाकिस्तानी सैन्याने याचा विचारही केला नव्हता, तिथे जाऊन आमच्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. सिंदूर हे आमच्या परंपरेचं प्रतीक आहे, आता ते भारताच्या शौर्याचे प्रतीक आहे, असेही मोदी म्‍हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button