Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा पाहा तुमचा रिझल्ट

SSC Result 2026 | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज, ८ मे रोजी जाहीर होत आहे. दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाईल. यामुळे राज्यभरातील सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.

यंदा दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडली. राज्यभरातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यामध्ये एकट्या मुंबई विभागातून ३ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणी प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा उभाराव्यात’; मंत्री नितेश राणे

येथे पाहता येईल निकाल

विद्यार्थ्यांना आपला निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे:

  • https://results.digilocker.gov.in
  • https://mahahsscboard.in
  • https://hscresult.mkcl.org
  • https://results.targetpublications.org
  • https://results.navneet.com
  • https://www.tv9marathi.com
  • https://education.indianexpress.com

डिजीलॉकरवर मिळणार गुणपत्रिका

ऑनलाइन निकालासोबतच विद्यार्थ्यांना आपली डिजिटल गुणपत्रिका ‘डिजीलॉकर’ (DigiLocker) ॲपवरही पाहता येईल. ही गुणपत्रिका भविष्यातील वापरासाठी तिथे डिजिटल स्वरूपात संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थी आपले रोल नंबर आणि आईचे नाव टाकून गुण पाहू शकतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button