Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Election News : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषद येथील संपूर्ण निवडणुकीसह अनेक ठिकाणच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे.

पातूर नगरपरिषदेत अध्यक्षपदासह २० सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच उमेदवारांच्या निधनामुळे स्थगित झालेल्या मनमाड, पिंपळनेर, गेवराई आणि अकोट येथील प्रत्येकी एका प्रभागासाठीही मतदान होणार आहे.

याशिवाय ११ जिल्ह्यांतील १४ नगरपंचायतींमधील १५ रिक्त जागा आणि ३ नगरपरिषदांमधील ३ जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. एकूण १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील ४७ रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

हेही वाचा –  ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणी प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा उभाराव्यात’; मंत्री नितेश राणे

निवडणूक वेळापत्रक

निवडणूक कार्यक्रम जाहीर – १२ मे २०२६

उमेदवारी अर्ज दाखल – १८ मे ते २५ मे

अर्ज छाननी – २६ मे

अर्ज मागे घेण्याची मुदत – २७ मे ते २ जून

मतदान – २० जून (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)

मतमोजणी आणि निकाल – २१ जून

या निवडणुकांमुळे संबंधित भागांतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button