डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात काय? अमेरिकेच्या नादी लागायचं नाय !

गेली सुमारे शंभर वर्षे संपूर्ण जगाने अमेरिकेला महासत्ता मानले आहे. या काळात त्यांना जो जो देश नडला किंवा आव्हान दिले अथवा विरोध केला, त्या देशाला उद्ध्वस्त करण्याचे कुभांड नेहमीच अमेरिकेने रचले. अनेक देशांना त्यांनी अक्षरशः देशोधडीला लावले. ‘अमेरिकेचा नाद करायचा नाय’ असा अलिखित इशाराच जणू त्यांनी संपूर्ण जगाला दिलेला आहे.
नडाल तर उद्ध्वस्त व्हाल !
जो जो देश अमेरिकेला नडला, त्या देशाला उद्ध्वस्त करून अमेरिकेने नेहमीच सूड उगवला आहे. पूर्वी जपानने त्यांना आव्हान दिल्यावर त्यांनी त्यांचा नाश केला होता हे अवघ्या जगाला माहीत आहे. जेव्हा संयुक्त रशियाने त्यांना आव्हान दिले, तेव्हा त्यांनी त्यांचे सतरा तुकडे केले होते, हा इतिहास सुद्धा अगदी ताजा आहे.
इराक तर किस झाड की पत्ती..
अमेरिकेच्या विरोधात इराकने डोके वर काढले तेव्हा त्यांनी त्यांचा नाश केला. इराक चे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना पकडून त्यांना फाशी देण्यापर्यंत मजल मारली गेली. अशा देशांची आधी आर्थिक नाकेबंदी करून त्यांना जेरीस आणण्याचा अमेरिकेचा नेहमीच प्रयत्न असतो.
आता अमेरिकेचे ‘टार्गेट’ चीन..
आता, अमेरिकेचे प्रमुख ‘टार्गेट’ हे चीन आहे. पण, भारताला अधिक भौगोलिक राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याने अमेरिकेची वाईट नजर कधी सुद्धा भारताकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताने नेहमीच अशा कपटी मित्रा पासून सावध राहायला हवे! गेल्या १०० वर्षांपासून अमेरिकन उद्योगपतींनी जगातील पहिल्या दहा उद्योगपतींवर वर्चस्व गाजवले आहे. पहिल्या दहा पैकी आठ- नऊ फक्त अमेरिकन उद्योगपती आहेत, हीच खऱ्या अर्थाने त्यांची अर्थनीती आहे.
दुसऱ्या देशांच्या उद्योगपतींविरुद्ध लॉबिंग..
चीनचा प्रसिद्ध उद्योगपती जॅक मा याने तिसरा क्रमांक पटकावल्यावर त्याच्याविरुद्ध ‘लॉबिंग’ सुरू झाले आणि त्यांना पळून जावे लागले, ते आता गौतम अदानी आणि मुकेश अंबानींसारख्या भारतीय उद्योगपतींच्या मागे लागले आहेत, याबाबत जागरूक राहायला हवे. अमेरिकेची ताकद हा त्यांचा माज आहे, ते तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या बळावर संपूर्ण जगावर नियंत्रण ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात.
हेही वाचा – त्रिवेणीनगरमधील चौकांमध्ये दोन्ही बाजूंना ‘हाईट बॅरीगेट्स’
अमेरिकेला आव्हान मान्य नसते..
कोणताही देश किंवा उद्योगपती त्यांच्याशी स्पर्धा करेल किंवा त्यांना आव्हान देईल, तर कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांचा सर्वनाश करतील, ही त्यांची खऱ्या अर्थाने रणनीती म्हणावी लागेल. गेल्या पाच वर्षात भारतीय उद्योगपती अदानी उंच भरारी घेत होता, गेल्या वर्षी तो जगातील दुसरा सर्वात मोठा उद्योगपती बनला होता. हाच वेग कायम राहिला असता तर २०२४ मध्ये तो जगातील सर्वात मोठा उद्योगपती बनला असता, जगाने भारताकडे पाहिले असते, हा दृष्टिकोन लक्षात घ्या!
तेल आयातीचे मोठे संकट..
एका महत्त्वाच्या विषयाकडे वळू. भारताचे तेल आयात बिल वाढल्याने १९९१ चे संकट देखील आले. अदानी भारताचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प, जगातील सर्वात कमी किमतीचा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारून भारताची ऊर्जा सुरक्षित करण्यासाठी काम करत आहे, जो कालांतराने तेल आणि वायूची जागा घेईल. हे हिंडनबर्गने अदानींवर वारंवार केलेल्या हल्ल्यांचे स्पष्टीकरण आहे आणि सीएनबीसी ने नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार, अदानी जगातील दुसरे ट्रिलियनियर बनले आहे, या ग्रुपवर हल्ले फक्त इथूनच तीव्र होतील, हा मुद्दा झटकन लक्षात येण्यासारखा आहे.
भारत स्वावलंबी झाला तर..
जर भारत ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमा चालवत असेल, तर याचा अर्थ भारत ही एक खूप मोठी बाजारपेठ आहे. जगातील वीस टक्के लोकसंख्येसह, इतर कोणत्याही अर्थव्यवस्थेपेक्षा वेगाने वाढत आहे. येत्या वीस वर्षात भारत स्वावलंबी झाला, तर अमेरिका, युरोप, चीन तसेच अरब जगताला मोठे नुकसान सहन करावे लागेल. एक डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होत राहील, असे त्या मागील आडाखे आहेत. भारतातही लॉबिंग सुरू झाले आहे, प्रत्येक देशात “पप्पस” ची कमतरता नाही. मीडिया विकत घेता येऊ शकतो.
भारतात देशद्रोहींची कमतरता नाही..
अफगाणिस्तानात रशियाविरुद्ध तालिबानसारख्या संघटना उभारण्यासाठी अमेरिकेने अब्जावधी, ट्रिलियन डॉलर्स खर्च केले होते, त्यामुळे रशियाला काढता पाय घ्यावा लागला होता. अमेरिकेच्या दृष्टीने भारताला अस्थिर करणे त्याहूनही सोपे आहे, इथे देशद्रोहींची कमतरता नाही, इथल्या काही नेत्यांची विधाने बघा, ते उघडपणे परदेशी एजंट सारखे काम करत आहेत..न्यायाधीश विकले जातात..मीडिया विकला जातो. नेते विक्रीसाठी आहेत, अशी ही देशद्रोही वक्तव्ये काय कामाची ?
भारताची मोठी बाजारपेठ खुपते..
भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे, भारताने स्वावलंबी व्हावे, असे कोणत्याही देशाला वाटत नाही, त्यामुळे अशा गोष्टी सांगणाऱ्या सरकारांना पराभूत करण्यासाठी मोठी ताकद लावली जात आहे. परकीय शक्तींना भारतात ‘मिश्र’ सरकार हवे आहे, जे पडण्याची नेहमीच भीती असते. जर भ्रष्ट सरकार असेल तर आपण आपल्या गरजेनुसार धोरणे, नियम आणि कायदे बनवू शकतो, आवश्यक अटींवर भारतात व्यवसाय करणे सोपे होईल, असे इतर देशांना वाटत असावे.
विदेशी उद्योगपतींचे पंख छाटण्याचा उद्योग..
गेल्या दहा वर्षांपासून भारतात स्थिर आणि मजबूत सरकार आहे
भारत सरकार आपल्याच उद्योगपतींना मजबूत बनवत आहे, याचा त्यांना त्रास आहे. त्यांची विचारसरणी अशी आहे की त्यांचे पंख छाटले पाहिजेत, कोणत्याही देशाचे बलस्थान हे तेथील ‘उद्योगपती’ आहे जे आपल्या देशातील कौशल्ये आणि वस्तूंचे परदेशात मार्केटिंग करतात,त्यांचे हित जपण्याचे काम सरकारचे आहे.
देशद्रोह्यांचा उद्योगपतीविरुद्ध शंख
भारतीय उद्योगपती सध्या संपूर्ण जगात अव्वल ठरत आहेत, हे अमेरिकेला मुळीच मान्य नाही. अशा उद्योगपतींना पाठिंबा देणे हे भारताचे कर्तव्य आहे, पण, आता आम्ही अंबानी यांच्या विरोधात शंख करणाऱ्यांना देशद्रोही म्हणायचे नाही तर काय ? तेच खऱ्या अर्थाने अमेरिकेचे एजंट आहेत, असे दुर्दैवाने म्हणण्याची वेळ आली आहे !