breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
IPL2020: हैदराबादचा दिल्लीवर दणदणीत विजय
क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच मंगळवारी या लीगमधील ४७ वा सामना खेळला गेला. काल दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला. यासामन्यात हैदराबादने दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला. हैदराबादने अष्टपैलू कामगिरीने दिल्लीला ८८ धावांनी पराभूत केले. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सुरुवातीपासूनच आक्रमक फटकेबाजी केली. त्याने ३४ चेंडूत ६६ धावांची खेळी केली.