breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

भारत-अमेरिकेत महत्त्वाचा संरक्षण करार

वॉशिंग्टन – भारत आणि अमेरिकेत Basic Exchange And Cooperation Agreement (BECA) हा महत्त्वाचा संरक्षण करार झाला आहे. काल दोन्ही देशाच्या मंत्र्यांमध्ये ‘टू प्लस टू’ बैठक झाली. यावेळी पाच मोठे करार करण्यात आले. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. या कराराअंतर्गत अमेरिका संरक्षणदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती भारतासोबत शेअर करणार आहे.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर आणि परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या बैठकीआधी अमेरिकेच्या दोन्ही मंत्र्यांशी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनीही चर्चा केली.

दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होत आहेत. टू प्लस टू बैठकीत दोन्ही देशांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यामध्ये कोरोनानंतरची स्थिती, जगातील सद्यस्थिती आणि सुरक्षेच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी अणु सहकार्य वाढविण्यासाठी पावले टाकली आहेत. तसेच भारतीय उपखंडात सुरक्षेबाबतही चर्चा झाली.

तर अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क्स एस्पर यांनी म्हटले की, सध्याच्या परिस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री केवळ आशियाच नाही तर जगासाठी महत्त्वाची आहे. चीनकडून जगाला धोका वाढत आहे. अशावेळी जगातील मोठ्या देशांनी एकत्र यायला हवे. भारत, जपान आणि अमेरिका सोबत अनेक लष्करी ऑपरेशन करू. मालाबार एक्ससाइजसुद्धा करण्यात येईल. याशिवाय दोन्ही देश एकमेकांसोबत डिफेन्स इन्फर्मेशन शेअरिंगमध्ये नव्या पातळीवर पोहोचत आहेत.

भारत आणि अमेरिकेत झालेले पाच करार
Basic Exchange And Cooperation Agreement (BECA)
MoU for technical cooperation on earth sciences
Arrangement extending the arrangement on nuclear cooperation
Agreement on postal services
Agreement on cooperation in ayurveda and cancer research

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button