breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

स्थायी समितीच्या सदस्य निवडीवरून नाशिकमध्ये राडा

नाशिक | महाईन्यूज

महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्य निवडीवरून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात राडा झाला. भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने नगरसेविका प्रियांका घाटे यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत पक्षाकडे राजीनामा दिला तर शिवसेनेत पूनम मोगरे यांना संधी न मिळाल्याने त्यांच्याही सदस्यांनी गोंधळ घातला आहे. स्थायी समितीचे आठ सदस्य 29 फेब्रुवारीस निवृत्त होत असून त्यांच्या जागी 8 नवे सदस्य नियुक्त करण्यासाठी विशेष महासभा आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली खाली झाली आहे.

यावेळी भाजपाकडून हेमंत शेट्टी, सुप्रिया खोडे, वर्षा भालेराव, शिवसेनेकडून सत्यभामा गाडेकर आणि सुधाकर बडगुजर तर काँग्रेसकडून राहुल दिवे तसेच राष्ट्रवादीकडून समीना मेमन यांच्या नावांची घोषणा केली. उमेदवारी न मिळाल्याने प्रियंका घाटे यांचे बंधू रोशन घाटे यांनी सभागृहाबाहेर गोंधळ घातला आणि विशिष्ट समाजाला डावलले जात असल्याचा आरोप केला या गोंधळामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सदस्य नियुक्त केले आणि तात्काळ सभा संपविली आहे. यानंतर घाटे समर्थक रामायण या महापौर निवासस्थानी ठाण मांडून बसले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button