breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरीत काँग्रेसची केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

पिंपरी – क्रांती दिन व युवक काँग्रेस स्थापना दिनानिमित्त बेराजगारीच्या प्रश्नावर केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यास आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पिंपरी पोलिस स्टेशनच्या कर्मचा-यांनी ताब्यात घेतले व भारतीय दंड विधान कलम १४९ नुसार नोटीस देऊन व समज देऊन सोडून देण्यात आले.

देशात प्रचंड प्रमाणात असलेल्या बेरोजगारी च्या समस्येवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज युवक काँग्रेस च्या वतीने पिंपरी चौकात भीमसृष्टी जवळ निदर्शने आयोजित करण्यात आली होती मात्र निदर्शने सुरू होताच पोलिसांनी संबंधीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सध्या जमावबंदी कलम १४४ लागू असल्याने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

याप्रसंगी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश युवक काँग्रेस सचिव अक्षय जैन, कौस्तूभ नवले, एनएसयूआय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, जिल्हा सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे यांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button