breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020 : राजस्थानचा चेन्नईवर दणदणीत विजय

शारजा – आयपीएलच्या १३व्या मोसमात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नईच्या बलाढ्य संघाला पराभूत करत सर्वांनाच जोरदार धक्का दिला. राजस्थानने चेन्नईचा १६ धावांनी पराभव केला. राजस्थानने चेन्नईसमोर २१७ धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र चेन्नईला केवळ २०० धावांपर्यंत मजल मारता आली. सामन्यापूर्वी चेन्नईचे पारडे राजस्थानपेक्षा जड वाटत होते. मात्र राजस्थानने शानदार कामगिरी करत विजय साकारला. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला असला, तरी संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने अखेरच्या षटकांत फटकावलेल्या तीन षटकारांनी क्रिकेटप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. कारण धोनीने तीन षटकार लगावून चेन्नईला विजय मिळणारच नव्हता.

काल रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थानने संजू सॅमसन, कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चरच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईसमोर २१७ धावांचे आव्हान ठेवले. सॅमसनने ३२ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांसह ७४ धावा केल्या. तर स्मिथनेही ६९ धावा केल्या. तसेच शेवटच्या षटकात आर्चरने तुफान फटकेबाजी करत अवघ्या ८ चेंडूत २७ धावा केल्या. तर चेन्नईकडून सॅम करनने ३, दीपक चहर-एन्गिडी आणि पियुष चावलाने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. त्याआधी संजू सॅमसनने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक ठोकले. आयपीएल २०२०मधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. सॅमसनने ३२ चेंडूत एक चौकर आणि ९ षटकारांसह ७४ धावा केल्या. यासह सॅमसन आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी राजस्थानकडून २०१८मध्ये जॉस बटलरने १८ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तसेच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. याआधी केएल राहुलने २०१९मध्ये चेन्नईविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

त्याचबरोबर कालच्या सामन्यात राजस्थानच्या २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने सावध सुरुवात केली. शेन वॉटसनने स्थिरस्थावर झाल्यावर जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळाले नाही. वॉटसनसह चेन्नईचे चार फलंदाज केवळ १५ धावांमध्ये बाद झाले. त्यामुळे चेन्नईचा संघ आता सामना हरणार, असे काही जणांना वाटत होते. परंतु त्यानंतर आलेल्या केदार जाधवने दमदार फलंदाजी करायला सुरुवात केली होती. मात्र त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थानचा फिरकीपटू राहुल टेवाटियाने यावेळी भेदक मारा करत चेन्नईच्या तीन फलंदाजांना बाद केले. त्यामुळेच चेन्नईचा संघ पिछाडीवर ढकलला गेला. त्याचबरोबर जोफ्रा आर्चरनेही भेदक गोलंदाजी करत चेन्नईच्या संघाच्या धावगतीला वेसण घातले. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज टॉम कुरननेही यावेळी धडाकेबाज गोलंदाजी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button