ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

आढळरावांचा गावकऱ्यांना सवाल, “विद्यमान खासदारांनी तुमच्या किती अपेक्षा पुर्ण केल्या”

उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी पाबळ येथे दिली भेट

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी पाबळ येथे भेट दिली. यावेळी आढळरावांचं गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केलं. यावेळी त्यांचं गावातील मता-भगिनींनी औक्षण देखील केलं. त्यानंतर आढळराव पाटील यांनी गावातील श्री हनुमान व गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

पाबळ येथील गावकऱ्यांकडून आढळराव पाटलांचा सत्कार करण्यात आला. तर गावातून १५०० मताचे भरघोष मताधिक्क देऊन तुम्हालाच विजयी करू, असा विश्वास गावकऱ्यांनी आढळराव पाटलांना दाखवला. त्यावर तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असे म्हणत आढळरावांनी गावात विकासकामांची गंगा वाहणार असं आश्वासन देखील दिलं. त्यानंतर लोकांच्या गाठीभेटी घेऊन आणि समस्या जाणून आज दोरा यशस्वी झाल्याची समाधान वाटत आहे. बारा दिवसानंतर आपले प्रश्न कोण सोडवणार यासाठी आपण मतदान करणार आहोत. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली.

तत्पूर्वी आपण ज्याला निवडून दिले, त्यांनी आपल्या किती अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, तपासणी तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामध्ये तुम्ही निवडून गेले. ज्या मुद्द्यावर एक शब्द बोलत नाही. ही सरळ सरळ फसवणूक आहे. आता नवीन मुद्दे काढले जाते. प्रश्न निर्माण केला जातो. महागाई अमुक तमुक प्रश्न काढून रडायचं होतं. तर मग तुम्हाला निवडून का दिले? असा सवाल करत आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केला.

पदावर नसतानाही भरपूर निधी आणला. परंतु त्याआधी आता अनेक प्रकल्प, योजना मला आंमलात आणायच्या आहेत. त्यासाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी सक्षम आहे. तुमचे प्रश्न तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी ही माझी जबाबदारी असेल. असा ठाम विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. तर मागील पाच वर्षाचा बॅक लॉग भरून काढायचा असेल तर शिवाजीदादा आढळराव पाटील हे शिलेदाराच्या भूमिकेत आपल्या समोर उभे आहेत आणि ही संधी आपल्याला सोडून चालणार नाही. असा विश्वास प्रदीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button