breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अंधेरी रुग्णालयातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर

मुंबईतील अंधेरी एमआयडीसी भागात असणाऱ्या कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. तर 157 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये अग्निशमन दलाच्या तीन जवानांचाही समावेश आहे. दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गंभीर जखमींना दोन लाख तर इतर जखमींना एक लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही मदत जाहीर केली आहे.

कामगार रूग्णालयाला सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचं समजत आहे. आग लागल्यानंतर झालेला धूर कोंडला होता. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आठ जणांचा मृत्यू झाला.

आग लागताच अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. ४० पेक्षा जास्त रूग्णांना शिडीच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. तसेच कूपर रूग्णालय, होली स्पिरीट हॉस्पिटल, बाळासाहेब ठाकरे ट्रोमा रूग्णालय, सेव्हन हिल हॉस्पिटल या विविध रूग्णालयांमध्ये या रूग्णालयातील रूग्णांना हलवण्यात आले. बचावकार्यादरम्यान एकाचा मृत्यू झाला होता.

कामगार रूग्णालय परिसरात आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे आठ बंब दाखल झाले. त्यानंतर आणखी चार बंब या ठिकाणी आले आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून ही आग नियंत्रणात आणली. रूग्णालयातल्या रूग्णांना बाहेर काढण्याचे काम सुरु असताना अनेकांनी गर्दी केली होती त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. पोलिसांनी रूग्णांच्या नातेवाईकांना पांगवले आणि त्यानंतर रूग्णांना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आले. अंधेरी पूर्व भागात असलेल्या एमआयडीसीत हे रूग्णालय आहे. कुलिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र या दुर्घटनेत आठ जण दगावले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button