breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

लॉकडाउन मध्ये सहा महिने वडापावचा धंदा बंंद, पैसे नाही म्हणुन विक्रेत्याची आत्महत्या

मुंबई: लॉकडाउन मुळे छोट्या मोठ्या व्यापारांवर मोठंं संंकट आलेलं आहे, मुंबई मध्ये लाखो नागरिकांंचंं पोट भरणारा वडापाव विक्रीचा व्यवसाय सुद्धा याला अपवाद नाहीये. मागील सहा महिन्यात गल्लोगल्ली असणारे वडापावच्या गाड्या बंद झालेल्या आहेत परिणामी याच रोजगारावर अवलंबुन असणार्‍या वडापाव विक्रेत्यांंवर आर्थिक संकटच कोसळलंंय आणि याच संकटाशी लढु न शकल्याने घाटकोपर मधील सदानंंद नाईक या वडापाव विक्रेत्याने आपले जीवन संपवल्याचे समजत आहे. नाईक यांंनी इमारतीच्या राहत्या घरातुन सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन मंगळवारी पहाटे आत्महत्या केलेली आहे. गेल्या सहा महिन्यात व्यवसाय पुर्ण बंंद असल्याने पैशाची चणचण होती अशावेळी घर चालवायचं कसंं या प्रश्नाने ते ग्रासलेले होते.

घाटकोपरच्या पंतनगर या भागात गोल्डन सोसायटी येथे पहाटे चार च्या सुमारास काही रहिवाशांंना इमारतीच्या कंपाऊंडमध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला सुरुवातीला यामुळे रहिवाश्यांंमध्ये बराच गोंंधळ झाला मात्र नंंतर तपास करता या इसमाचे नाव सदानंद नाईक असल्याचे समजले आहे. यावेळी इमारतीतील रहिवाशांंनी त्यांना तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी नाईक यांंना मृत घोषित केलेले आहे. दरम्यान, पंतनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुहास कांबळे यांंनी सांंगितल्याप्रमाणे पोलिसांंनी,अपघाती मृत्यू अहवाल दाखल केलेला आहे, मात्र नाईक यांंच्या आत्महत्येचे कारण दर्शविणार्‍या कोणत्याही ठोस कारणाचा अद्याप तपास लागलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button