breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अभिनेत्रीने मंगळवारी तिचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यासोबत वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन कश्यपविरोधात लेखी तक्रार दिली होती. तसेच त्याच्याविरोधात बलात्कारासह अन्य गंभीर कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार रात्री उशीरा कश्यपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी सांगितले.

शनिवारी बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट करत दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचे आरोप केले होते. एवढेच नाही तर तिने एक पोस्ट करत या प्रकरणी पंतप्रधान मोदींकडे मदतही मागितली होती. अभिनेत्रीने दावा केला आहे की, ही घटना 2014-2015मधील आहे.

अनुराग कश्यपने 2014मध्ये माझ्यासोबत छेडछाड केली होती. ज्या मुली माझ्यासोबत काम करतात, त्यांच्यासोबत मी ‘गाला टाईम’ घालवतो, असे अनुरागने सांगितले असल्याचे ती म्हणाली. ‘त्यावेळी अनुरागच्या ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाचे काम सुरू होते. रणबीर कपूरसोबत एका चित्रपटात काम करण्यासाठी मुली त्याच्यासोबत शय्यासोबत करण्यास तयार होत्या, असेही त्याने म्हटले. यानंतर त्याने एक अडल्ट चित्रपट पाहण्यास सुरुवात केली. तो अचानक निर्वस्त्र झाला आणि मलाही कपडे काढण्यास सांगू लागला. त्यावेळी मी खूप घाबरले. मी आजारी असल्याचे कारण देऊन कसाबसा तिथून पळ काढला’, असे अभिनेत्रीने म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button