breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सोशल मीडियावर चिथावणीखोर व्हिडिओ पाठवल्यास 3 वर्षे शिक्षेची तरतूद

सोशल मीडियावर वातावरण खराब करण्यासाठी पसरवण्यात येत असलेल्या चुकीच्या आणि चिथावणीखोर व्हिडिओवरुन दिल्ली सरकारने सक्तीचे धोरण आखले आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ पसरवणाऱ्या लोकांवर सरकार आयटी एक्ट 56 अ आणि आयपीसीचे कलम 153 अ, 506 नुसार कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. त्यात ३ वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.

दिल्ली सरकार लवकरच एक व्हॉट्सअप नंबर जारी करणार आहे. नागरिकांकडे अशा पद्धतीचे कोणतेही व्हिडिओ जे धार्मिक रुपाने चिथावणीखोर असतील आणि सामाजिक वातावरण खराब करणारे असतील. यावरुन सरकारला निर्दशनास आणून द्या, असे आवाहन सरकारने केले आहे. हा व्हिडिओ कुठून आला आहे. कोणत्या नंबरवरुन पाठवण्यात आला आहे. किंवा सोशल मीडियावर कोणी शेअर केला, ही सर्व माहिती नागरिकांना दिल्ली सरकारला द्यावी लागेल. सरकार दिल्ली पोलिसांच्या मदतीने अशा लोकांवर कारवाई करेल. यामध्ये ३ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button