आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई

गव्हाच्या पीठामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई आणि जिंक

निरोगी आरोग्यासाठी आहारामध्ये पोषक घटकांचा समावेश गरजेचे

मुंबई : अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठापासून चपाती किंवा मिठाई असे अनेक पदार्ख बनवले जातात. अनेक घरांमध्ये दोन्ही टाईम गव्हाची चपाती आणि भाजी बनवली जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का गव्हाच्या पीठामध्ये काही विशेष गोष्टी मिक्स केल्यामुळे त्यामधील पोषक तत्वं अधिक वाढतात आणि तुमच्या शरीराला पोषण मिळते. निरोगी शरीरासाठी तुमच्या शरीरामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. गव्हाच्या पीठामध्ये अनखी काही धान्य मिसळल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळते त्यासोबतच तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.

गव्हाच्या पीठामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई आणि जिंक असते, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी, ताजी आणि आकर्षक दिसते. गव्हाच्या पीठाने चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड सेल्स निधून जातात आणि त्वचा अधिक चमकदार होते. गव्हाच्या पीठामध्ये असलेले फायबर तुमच्या पोटाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. त्यासोबतच तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. गव्हाच्या पीठामध्ये असलेले पोषक घटक हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. गव्हाच्या पीठामधील असलेले पोषक घटक संतुलित आहारात समाविष्ट केल्यास आरोग्य चांगले राहते.

हेही वाचा  :  ‘धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते’; मनोज जरांगे पाटील

गव्हाच्या पीठामध्ये ‘या’ गोष्टी मिसळा :

1) आळशीच्या बिया – आळशीच्या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि फायबर असतात, ज्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही आळशीच्या बिया बारीक करून त्यात गव्हाच्या पिठात मिसळले तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आळशीच्या बियांमुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते त्यासोबतच तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

2) चणा डाळ – चणा डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि फायबर असते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायू तयार करण्यास मदत होते. त्यासोबतच चण्याची डाळ तुमच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते. हरभरा डाळीच्या पीठात भरपूर प्रथिने असतात, त्यामुळे तुम्हाच्या शरीराला उर्जा आणि ताकद मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही हरभरा डाळी बारीक करून त्याचे पीठ गव्हाच्या पिठात मिसळू शकता.

3) गूळ – गुळामध्ये लोह आणि इतर पोषक घटक असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्त तयार होण्यास आणि ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते. गूळ बारीक करून त्यात गव्हाचे पीठ मिसळले तर पिठाची चवही वाढते. पण लक्षात ठेवा की गूळ जास्त प्रमाणात मिसळू नये.

4) ओवा – ओव्यामध्ये भरपूर प्रमाणात दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते आणि तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. दुसर कारण म्हमजे ओव्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी होते त्यासोबतच महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या समस्या दूर होतील. ओव्यामुळे गव्हाच्या पीठाची चव वाढते.

5) मेथीचे दाणे –  मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर आणि मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. मेथीचे दाणे योग्य प्रमाणात गव्हाच्या पीठामध्ये मिसळल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button