विद्यार्थ्यांनी कला सादरीकरणातून जिंकली उपस्थितांची मने!
शिक्षण विश्व : न्यू पुणे पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पिंपरी- चिंचवड | चिंचवड एज्युकेशन सोसायटीच्या न्यू पुणे पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून उपस्थितांची मने जिंकली.
चिंचवड एज्यूकेशन सोसायटीच्या न्यू पुणे पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन प्राधिकरण मधील, ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे मागील दोन दिवसांत मोठ्या उत्साहात पार पडले.
हेही वाचा : ‘एआय’च्या नैतिक आणि शाश्वत वापरासाठी धोरण निश्चित करावे लागणार; प्रा. किरणकुमार जोहरे
या कार्यक्रमाचे उद्घाटन जी. के. गुरुकुलच्या डायरेक्टर ज्योती जैसवाणी यांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहसंमेलनात पहिल्या दिवशी इयत्ता ५वी ते वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासह विविध स्पर्धामध्ये नावीन्य प्राप्त विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध गुणदर्शनातून सर्व पालकांचे मनोरंजन करण्यात आले.
स्नेहसंमेलनात् दुसऱ्या दिवशी युकेजी ते ४ थी च्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड पालिकेचे निलेश भदाणे , संस्थेचे सचिव, प्रदिपकुमार खंदारे, संस्थेच्या विश्वस्तू ॲड. अमृता खंदारे, स्कूलच्या प्राचार्या आदींसह शिक्षक, पालक, हितचिंतक व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.