शिक्षण विश्व: आगामी काळात लेखापालांची मोठी गरज!
शिक्षण विश्व; प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात व्यवस्थापन सप्ताह व्याख्यानमाला

पिंपरी-चिंचवड : विपणन किंवा अकाउंटिंग क्षेत्र हे सर्वव्यापी आहे. अकाउंटिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने चांगल्या संधी उपलब्ध आहेत. अकाउंटंट अर्थात लेखापालांची आज नितांत गरज असताना, आगामी काळात त्यांची गरज आणखी वाढेल असे मत आकुर्डी येथे व्याख्यानमालेत व्यक्त करण्यात आले.
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी येथे वाणिज्य विभागाच्या अंतर्गत पाच दिवसीय (३ ते ७ फेब्रुवारी ) व्यवस्थापन सप्ताह व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. सी. ए. विजय क्षीरसागर व सी. ए. अरुण रिंगणे, गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांच्या हस्ते उदघाट्न झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. हिरालाल सोनावणे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. पद्मावती इंगोले, समन्वयक डॉ. दिलीप कोतकर, डॉ. रामदास लाड, डॉ. स्वाती जगताप व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व दीपप्रज्वलनाने झाली. व्यवस्थापन सप्ताहाच्या अंतर्गत आयोजित व्याख्यानमालेसाठी प्रथम पुष्प गुंफण्यासाठी सी. ए. विजय क्षीरसागर व सी. ए. अरुण रिंगणे प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून लाभले.
हेही वाचा – कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यांचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावा!
सी.ए. विजय क्षीरसागर यांनी वाणिज्य क्षेत्रातील तसेच अकाउंटिंग क्षेत्रातील विविध संधी यावर विद्यार्थ्यांशी हितगुज केले. तर सी. ए. अरुण रिंगणे यांनी “आत्मविश्वास व संघर्ष” या सगळ्या गोष्टींवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांना प्रेरित केले. विपणन क्षेत्र सर्वव्यापी आहे. विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी यात संधी मिळते. यामध्ये टीमवर्क, नेतृत्व, संवाद साधण्याची क्षमता, माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश होतो. असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. अभय खंडागळे सर यांनी विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो व यासाठी विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन व अशा कार्यक्रमांचा अनुभव देखील घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. वाणिज्य विभागाच्या अधिष्ठाता तथा प्रमुख डॉ. पद्मावती इंगोले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना असेच कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवावेत असे मार्गदर्शन केले.
संपूर्ण व्यवस्थापन सप्ताहाचे समन्वयक म्हणून वाणिज्य विभागाचे डॉ. दिलीप कोतकर यांनी काम पाहिले. वाणिज्य विभागाचे डॉ. रामदास लाड व डॉ. स्वाती जगताप यांनी नियोजन केले. त्यांना वाणिज्य विभागातील इतर सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले. विद्यार्थी प्रतिनिधी कु. आर्या चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी प्रतिनिधी हर्षदा तनपुरे, आरती चिकटे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. आभारप्रदर्शन सूरज सुर्वे यांनी व्यक्त केले. . डॉ. अर्चना माळी, डॉ. शुभांगी भालेकर प्रा. विक्रांत शेळके, प्रा. सरिता भंडारी, प्रा. सुशील गायकवाड, प्रा. वर्षा ढमाले, प्रा. प्रियांका वटकर, प्रा. सुप्रिया बिराजदार, प्रा. चंद्रकांत कुंभार, प्रा. रेश्मा रोडे, प्रा. नेत्रा लोहकरे, प्रा. रिटा वर्मा यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.