‘धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते’; मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil | धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेटायला आले होते, असं मनोज जरांगेंनी सांगितलं. तसेच, आरोपींना यंत्रणा सोडणार नाही, टोळी धनंजय मुंडे यांची आहे, आरोपींना लपवत आहे. यांच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण यातांना भोगल्या या टोळीमुळे, असा दावाही मनोज जरांगे यांनी यावेळी केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, की धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते. त्याआधी आठ दिवसांपासून फोन येत होते. रात्री दोन वाजता आले, सोबत वाल्मिक कराड होता. मी झोपलो होतो ते आत आले. धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हार्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असं त्यांना म्हटलं होतं. त्यांनी लक्ष राहुद्या असं म्हटलं. जाताना पाया पडले.
हेही वाचा : महाराष्ट्र केसरी ‘‘राडा’’ : पैलवान शिवराज राक्षे, महेंद्र गायवाड तीन वर्षे निलंबीत
महंत नामदेवशास्त्री यांचं जे बोलायचं आहे ते बोलून झालं आहे, या टोळीने दाखवलं किती जातीयवाद असतो. असे जातीयवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आहेत. आरोपींचे समर्थन करणारे शब्द महाराष्ट्रचं नुकसान करणारे आहे, पोटातील ओठावर आले. बाबाला दोष देत नाही, करून घेणारी टोळी आहे.स्वतः साठी देवधर्म कळेना..काही लोकांनी ओबीसीच्या नावाखाली अन्यथा सहन केला. ओबीसी असून देखील त्यांच्यावर अन्याय झाला.. आता लोक व्यक्त होत आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.