आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय

ताजेतवाने वाटण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी चांगली झोप खूप गरजेचं

थकल्यानंतर रात्री नीट झोप लागत नाहीये? 'या' टिप्स देतील आरामदायक झोप

राष्ट्रीय : तुम्ही एखाद्या दिवशी खूप थकले असाल तर तुम्हाला लगेच चांगली झोप लागते. अशातच तुम्हाला चांगली झोप लागली तर त्याचा तुमच्या शरीरालाच नव्हे तर मनालाही आराम मिळतो. आजकालचे व्यस्त जीवन, कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे लोकांना नीट झोप येत नाही. अनेकदा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकल्याने सुद्धा झोप येत नाही. पण हा थकवा दूर करण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी चांगली झोप घेणं खूप गरजेचं आहे. मात्र, काही लोकं थकल्यानंतर अनेकदा झोपत नाहीत. यामागे शरीरात पोषक तत्वांची कमतरता देखील असू शकते. सध्या तुम्ही चांगल्या झोपेसाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. प्रौढ व्यक्तीने दररोज किमान सात ते आठ तासांची चांगली झोप घ्यावी. यासोबतच योग्य वेळी झोप घेणंही गरजेचं आहे. रात्री उशीरापर्यंत जागे राहण्याची सवय ही निद्रानाशाची समस्या असू शकते. तर निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज काही वेळ चालणे, हलके वर्कआउट करणे यासारख्या शारीरिक हालचाली करणे खूप गरजेचे आहे. याशिवाय भरपूर झोप घ्या. नीट झोप न घेतल्याने वजन वाढण्याबरोबरच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. चांगल्या झोपेसाठी काय करावे ते आपण जाणून घेऊया.

झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स दूर ठेवा
बऱ्याचदा आपण पाहतो की अनेकांना झोपण्याच्या आधी टीव्ही पाहण्याची सवय असते. खाकरून आजच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन पाहत असतात. त्यामुळे अनेकदा झोपण्यापूर्वी मोबाईल डोक्याजवळ ठेऊन झोपतात. अशाने तुमची सारखी झोप मोड होत असते. तर अनेकदा फोन बंद केल्यानंतर सुद्धा बराच वेळ झोप लागत नाही. यासाठी झोपण्यापूर्वी एक तास आधी लॅपटॉप, फोन बंद करून ठेवा. तसेच कोणत्याही स्क्रीन केलेल्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर राहा.

हेही वाचा  :  चऱ्होलीमधील मुलांची नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक कामगिरी!

झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करावी.

जेव्हा तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटते तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. हा मार्ग अवलंबल्याने तुम्हाला खूप फ्रेश आणि रिलॅक्स वाटते, तसेच स्नायूंचा थकवा कमी होऊन तुम्हाला चांगली झोप लागते.

तेलाने मसाज करा

झोप येत नसेल तर किमान 20 मिनिटे पाय कोमट पाण्यात ठेवा आणि नंतर टॉवेलने पाय नीट पुसल्यानंतर तळव्याला थोड्या तेलाने मसाज करा. यासोबतच तुमच्या पायांच्या पोटऱ्याना देखील तेलाने मालिश केल्यानेही चांगली झोप येते.

झोपेच्या वेळी योगा करणे योग्य आहे का?

जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही झोपेच्या वेळी योगा करू शकता. यात तुम्ही बुद्ध कोनासन, सुखासन, शवासन, इत्यादी योगासन करू शकता. याशिवाय चिंता, तणाव यासारख्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी दररोज काही वेळ मेडिटेशन करा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button