चऱ्होलीमधील मुलांची नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक कामगिरी!
क्रीडा विश्व: पद्मश्री मुरलीकांत पेटकर नॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2025

पिंपरी- चिंचवड | शिवछत्रपती स्टेडियम बालेवाडी येथे पद्मश्री मुरलीकांत पेटकर नॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये चऱ्होलीमधील मुलांनी नेत्रदीपक कामगिरी केली. या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक पटकावले.
बालेवाडी येथे या स्पर्धा 25 आणि 26 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे आयोजन किसनराव तापकीर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने ॲड.कुणाल किसनराव तापकीर यांच्या वतीने सुरू करण्यात आले होते.
हेही वाचा : ‘एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’; सुरेश धस यांचे गंभीर आरोप
या स्पर्धांमध्ये सात वर्षे वयोगटामध्ये कुशल उमेश पवार कराटे फाईट याने सुवर्णपदक पटकावले. नऊ वर्ष वयोगटात वेद ज्ञानदेव शितोळे याने रौप्य पदक तर स्वराज संतोष होंगुले याने कांस्यपदक पटकावले. अकरा वर्षे वयोगटात ललित सचिन पाटील याने रौप्य पदकाची कमाई केली. बारा वर्षे वयोगटात सोहम बालाजी जाधव याने कांस्य पदक मिळविले. अबूबकर इनामदार याने कांस्यपदक पटकावले.
चौदा वर्षे वयोगटात सेजल दत्तात्रय काळे हिला कांस्यपदक तर अक्षद निलेश लळे याने पंधरा वर्षे वयोगटात कांस्यपदक पटकावले. सोळा वर्षे वयोगटात प्रियंका किशोर ढाळे सुवर्णपदका सहित रौप्य पदकाची देखील कमाई केली. वेदिका विश्वनाथ रसाळने रौप्य पदक व पदक, 19 वर्षे वयोगटात अश्विनी चंद्रशेखर भोकरे हीने रौप्य पदक व.कांस्य पदक मिळविले. नेहा गावडे, समर्थ तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी प्रशिक्षण देण्यात आले होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
किसनराव तापकीर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट संचलित शिवाई माझी सुरक्षित बहीण योजना या प्रशिक्षणांतर्गत सर्व मुलांना मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात येते. यातून विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या सक्षम होत आहेत.
– ॲड कुणाल किसन महाराज तापकीर, चऱ्होली.





