Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धर्मकार्यात कोणत्या लवांडेनी लडबूड करु नये; आमदार महेश लांडगे

ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांच्या शाईफेकीचे समर्थन

धर्माचा प्रचार, प्रसार करणाऱ्यांचा आदर ठेवलाच पाहीजे

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

हिंदू धर्माच्या प्रचार, प्रसारासाठी काम करणाऱ्या प्रबोधरकार, कीर्तनकार आणि संतांचा आदर ठेवलाच पाहिजे. विकास लवांडे यांच्याबाबत ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांनी केलेल्या शाईफेकीचे आम्ही जाहीर समर्थन करतो, असे भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

‘‘वारकरी सांप्रदायातील २० घुसखोर’’ अशी टीका करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीरपणे केली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटनांमधून निषेध व्यक्त होत होता. दरम्यान, ह.भ.प. संग्रामबापू भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आळंदी येथे लवांडे यांच्यावर शाईफेक केली.

हेही वाचा

भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ! यशस्वी जैस्वाल आणि शफाली वर्माला ‘नाडा’ची नोटीस

आमदार लांडगे म्हणाले की, ह.भ.प. संग्रामबापू हे सुरुवातीपासूनच धर्मनिष्ठ असून हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. “वारकरी संप्रदायातील आदरणीय महाराज मंडळींबद्दल लवांडे यांनी वापरलेले शब्द अत्यंत चुकीचे होते. समाजातील अशा प्रवृत्तींविरुद्ध लोकांमध्ये संताप असणे स्वाभाविक आहे. ज्या २० व्यक्तींच्या संदर्भात लवांडे यांनी वक्तव्य केले आहे, त्यांचे सामाजिक कार्य त्यांनी आधी पाहावे. हे महाराज समाजातील वंचित घटकांसाठी अविरत काम करत आहेत. वैचारिक मतभेद की पातळी? हा राजकीय वाद नसून वैचारिक मतभेदाचा विषय आहे.

तसेच, लवांडे यांच्यासारखी मंडळी स्वतःला विद्वान समजून समाजात विष कालवण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. वारकरी संप्रदाय आणि धार्मिक परंपरांवरील टीका समाज सहन करणार नाही, इशाराही आमदार लांडगे यांनी दिला आहे.

“आपण प्रवक्ते म्हणून हुशार असाल, पण वारकरी संप्रदायातील दिग्गजांवर बोलण्याइतकी कोणाचीच उंची नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी’’ अशी शिकवण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी दिली आहे. समाजाला दिशा देण्यासाठी प्रसंगी कठोर पावले उचलणे गैर नाही. त्यामुळे ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांचे जाहीर समर्थक करतो.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button