Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील डॉ. आदित्य पतकराव व टीमच्या शोधाला भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाची मान्यता

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. आदित्य पतकराव, डॉ. राघवेंद्र मेडीकरी आणि डॉ. ज्योत्सना अड्डे यांना त्यांच्या AI आधारित डेंटल रेडियोग्राफ एनालिसिस सिस्टम या अद्वितीय शोधासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरणाऱ्या या प्रणालीद्वारे दात व हिरड्यांच्या समस्यांचे अचूक निदान करणे शक्य होणार आहे. या प्रणालीच्या मदतीने पेरियोडोंटल डिजीज (हिरड्यांचे आजार) यांसारख्या गंभीर आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करता येणार आहे. रेडियोग्राफ डेटाचा सखोल अभ्यास करून ही प्रणाली सूज, हाडांच्या हानीसारखे लक्षणे ओळखते आणि समस्येची तीव्रता ठरवते.

हेही वाचा  :  चऱ्होलीमधील मुलांची नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक कामगिरी! 

या तंत्रज्ञानाला अधिक परिपूर्ण करण्यामध्ये डॉ. राघवेंद्र मेडीकरी आणि डॉ. ज्योत्सना अड्डे यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी या प्रणालीची विश्वासार्हता आणि अचूकता सिद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

डॉ. आदित्य पतकराव म्हणाले, “पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत ही तंत्रज्ञान अधिक वेगवान आणि अचूक आहे. हे केवळ दंतचिकित्सकांची कार्यक्षमता वाढवणार नाही, तर रुग्णांच्या उपचारांना जलद आणि उच्च दर्जाचे बनवेल.”

दंतचिकित्सेच्या क्षेत्रात हा शोध एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुण्यातील डॉ. आदित्य पतकराव आणि त्यांच्या टीमचा हा शोध संपूर्ण भारताला अभिमान आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button