Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

उन्हाळ्यात घाम गाळल्याने खरंच वजन कमी होतं का? ‘या’ 5 चुका टाळा, अन्यथा ओढवू शकतं गंभीर आरोग्य संकट!

Best Time for Exercise in Summer : उन्हाळ्यात शरीरातून घाम जास्त येत असल्यामुळे कॅलरीज् खर्च होतात. वजन कमी करण्यासाठी हा काळ उपयुक्त मानला जातो. मात्र केवळ घाम येणे म्हणजे वजन कमी होणे असेही नव्हे.

उन्हाळ्यात व्यायाम करताना केवळ उत्साह नव्हे, तर बिनचूक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक ठरते. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. उष्माघाताचा धोका असतो. योग्य वेळ, ठिकाण आणि व्यायामाची तीव्रता यांचे नियोजन गरजेचे असते.

व्यायामासाठी पहाटेपासून सूर्योदयानंतरची काहीशी वेळ किंवा ती उपलब्ध नसल्यास पर्याय म्हणून सूर्यास्तानंतरचा कालावधी योग्य मानला जातो. दुपारी किंवा सायंकाळी व्यायामाला सुरुवात होण्यापूर्वी केल्यास शरीरावर अनावश्यक ताण येतो. क्रीडांगणे, उद्याने, पर्यायी हवेशीर व्यायामशाळा (जिम) ठिकाणे योग्य ठरतात. बंदिस्त आणि उष्ण वातावरणात व्यायाम केल्यास थकवा व अस्वस्थता वाढू शकते.

हेही वाचा –  पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका देणारा “कप बशी” चित्रपटाचा टीजर लाँच

सध्या कडक उन्हाळा आहे. व्यायाम करताना शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता टाळण्यासाठी नियमित भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. हलके, सैल व घाम शोषणारे कपडे वापरावेत. व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप (स्नायूंची हालचाल) करावी. क्षमतेनुसार व्यायामाची तीव्रता वाढवावी. हीच योग्य पद्धत. व्यायाम करताना चक्कर येणे, थकवा, मळमळ, छातीवर ताण अशी लक्षणे जाणवताच तत्काळ विश्रांती घेणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात शरीरातून घाम जास्त येत असल्यामुळे कॅलरीज् खर्च होतात. वजन कमी करण्यासाठी हा काळ उपयुक्त मानला जातो. मात्र केवळ घाम येणे म्हणजे वजन कमी होणे असेही नव्हे, तर संतुलित आहार, पुरेशी विश्रांती आणि नियमित व्यायाम यांचा समन्वय महत्त्वाचा ठरतो. शरीराची पुरेपूर काळजी घेऊन केलेला कोणताही व्यायामप्रकार हितकारक ठरावा.

व्यायाम करणाऱ्यांनी शरीरातील पाण्याचे संतुलन, ऊर्जा टिकवून ठेवणारा आहार घेणे आवश्यक आहे. पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे जसे टरबूज, खरबूज, संत्री यांचा समावेश करावा. काकडी, टोमॅटो, गाजर यांसारख्या भाज्यांचे सॅलड उपयुक्त ठरते. ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला ताजेतवाने ठेवतात, तर प्रथिनांकरिता डाळी, कडधान्ये, मूग, अंडी किंवा हलका प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळावेत. व्यायामानंतर पौष्टिक आहार घेतल्यास शरीर तंदुरुस्त राहते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button