breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

Ground Report : … म्हणून महेश लांडगे ‘नारळावर’ आमदार झाले : मंगलदास बांदल

राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, सुनील टिंगरे यांच्या उपस्थितीत ‘बँटिंग’

पुणे । विशेष प्रतिनिधी 

भोसरीत भव्य-दिव्य महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली. पैलवानांवर आणि बैलगाड्यावर नितांत प्रेम केले आणि प्रचंड मोदी लाट असतानाही शड्डू ठोकून भोसरी विधानसभा मतदार संघात उतरले. गावगाडा आणि मातीवर प्रेम करणारा महेश लांडगेंसारखा पट्टा ‘नारळ’ चिन्हावर आमदार झाला, अशा शब्दांत पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी भाजपा आमदार तथा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे कौतूक केले. 

विशेष म्हणजे, व्यासपीठावर राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि वडगाव शेरीची आमदार सुनील टिंगरे हेसुद्धा उपस्थित होते.

खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चऱ्होली खुर्द येथे ‘‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत’’चे आयोजन केले आहे. महिंद्रा थार, ट्रॅक्टर आणि दुचाकी अशी भव्य बक्षीसे असलेल्या या शर्यती पाच दिवस होणार आहे. या शर्यतीकरीता पंचक्रोशीतील शेतकरी, गाडाप्रेमी नागरिकांनी प्रचंड गर्दी आहे.

मंगलदास बांदल म्हणाले की, बैलगाडावाले आणि पैलवानांमध्ये राहिलेला माणूस लोकांमध्ये मिसळतो, म्हणून लोक त्याला साथ देतात. बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर प्रत्येकाने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘कुणाच्या कोंबड्याने सूर्य उगवला’ हे महत्त्वाचे नाही. आता शर्यत सुरू झाली आहे. ती टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. सगळे पक्षाचे लोक म्हणायचे होते. गाडा चालू झाला पाहिजे. सर्व गाडेवाल्यांच्या जीवावर राज्यकर्त्यांना गुडघे टेकायला लावले.

रामदासशेठ ठाकूर यांची आकांक्षा पूर्ण होणार…

रामदासशेठ ठाकूर यांच्या वाढदिनानिमित्त भरवलेल्या ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यती’ला गाडेवाल्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. गाडेवाल्यांची ही गर्दी आहे. गाडेवाल्यांनी ठरवले तर ‘‘नकट्याल्याचं नाकेलं होतं अन्‌ नाकेल्याचं नकटं होतं..’’. घाटावरील गर्दी पाहून मला वाटते की, रामदासशेठ ठाकूर यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार आहे. काहीतरी झाल्यासारखं वाटतंय… पण, मी आमदार झाल्यासारखं वाटतंय…असे म्हणणार नाही. कारण, लोकच त्याबाबत निर्णय घेतली. शेतकरी कुटुंबातील रामदासशेठ ठाकूर यांनी मिळालेली प्रत्येक संधीचे सोने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button