breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

राज ठाकरे योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता

मुंबई |

उत्तर प्रदेशातील बहुतांश मशिदीवरचे भोंगे उतरविल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ५ जूनला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असतील. त्याअगोदर राज ठाकरे योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा, हिंदुत्व अशा मुद्द्यांवरुन राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्यातून आणि उत्तर सभेतून याच मुद्द्यांवर भर दिला तसंच मशिदीवरील भोंगे हटविण्यासंबंधी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला.परंतु राज ठाकरेंच्या सभेचा परिणाम उत्तर प्रदेशात पाहायला मिळाला. तिकडे प्रार्थनास्थळावरील भोंगे विशेषत: मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात सरकारने कडक पावलं उचलली.

एकंदरित राज ठाकरेंच्या घोषणा आणि अल्टिमेटमचा परिणाम शेकडो किलोमीटर दूर असलेल्या उत्तर प्रदेशात झाला. याचमुळे योगी सरकारवर राज ठाकरे खूश आहेत. गुडी पाडवा मेळाव्यातूनही राज ठाकरेंनी योगी सरकारचं कौतुक केलं होतं. आता मशिदीवरी भोंगे हटविल्यानंतर योगी सरकारवर राज ठाकरे भलतेच खूश झाले आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्यात राज ठाकरे योगींची भेट घेण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंकडून सकाळीच योगी आदित्यनाथ यांचं जाहीर कौतुक

राज ठाकरे यांनी आज सकाळीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं जाहीरपणे कौतुक केलं. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी अभिनंदन केलं.”उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार” असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं. याशिवाय याच ट्विटमधून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही आहेत ते फक्त सत्तेचे भोगी, महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना” असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन करताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button