TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमहाराष्ट्रमुंबई

चुरशीच्या लढतीत पुणे पलानी टस्कर्स संघाची पालघर संघावर मात

पुण्यात के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजचा थरार

पुणे: गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे पलानी टस्कर्स व सातव्या क्रमांकावर असलेल्या पालघर काझीरंगा रहिनोस यांच्यात आज लढत झाली. पालघरच्या कर्णधाराला आज बचावफळीची चांगली साथ मिळत होती. तर पुणेचे चढाईपटू एकमेकांना चांगली साथ देत होते. पहिल्या दहा मिनिटात 9-9 असा बरोबरीत सामना सुरू होता.

पुणे पलानी टस्कर्स संघाने पालघर संघावर लोन पडत आघाडी मिळवली होती पण पालघरच्या राहुल सवरने पुन्हा एकदा सुपर टेन करत व अष्टपैलू खेळ दाखवत संघाला सामन्यात आणला. मध्यंतराला पालघर संघाने 20-19 अशी एक गुणांची आघाडी घेतली.

मध्यंतरा नंतरही पालघरच्या राहुल सवरने चतुरस्त्र चढाया करत पुणे संघावर लोन पडला. एकप्रकारे लढत राहुल सवर विरुद्ध पुणे संघ अशी सूरु होती. शेवटची 10 मिनिटे शिल्लक असताना पालघर संघाकडे 28-25 अशी आघाडी होती. त्यानंतर पुणेच्या विशाल ताटे ने आक्रमक चढाया करत 18 गुण मिळवत पुणे संघाला 40-37 असा विजय मिळवून दिला. पालघरच्या राहुल सवरची 21 गुणांची खेळी पुन्हा संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडली.

बेस्ट रेडर- राहुल सवर, पालघर काझीरंगा रहिनोस
बेस्ट डिफेंडर- पियुष पाटील, पालघर काझीरंगा रहिनोस
कबड्डी का कमाल- विशाल ताटे, पुणे पलानी टस्कर्स

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button