breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मुंबईसह देशात 3 ठिकाणी अत्याधुनिक लॅब, उद्घाटनासाठी पंतप्रधानांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईसह देशभरात तीन ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलेले आहे. 27 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रयोगशाळांचं उद्घाटन करणार आहेत. या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणाच्या कामाला मदत मिळणार आहे.

मुंबईसह देशात कोलकाता आणि नोयडा येथेही या अत्याधुनिक कोविड प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी तिन्ही ठिकाणी आयसीएमआरच्या संशोधन संस्थांची निवड करण्यात आलेली आहे. या सुविधेमुळे चाचणी करण्यातील वेळ देखील कमी होणार आहे. तसेच प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांचा बाहेरच्या वातावरणाशी संपर्क कमी होऊन संसर्ग वाढण्याचा धोकाही कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या कार्यक्रमात पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेल्या निमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे, “कोविड 19 च्या साथीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारं परस्पर समन्वयातून महत्त्वाची पावलं उचलत आहेत. याचाच भाग म्हणून कोरोना चाचणीच्या सुविधांमध्ये काही अत्याधुनिक सुविधांचा समावेश देखील केला जात आहे. यासाठी आयसीएमआर देशभरात तीन ठिकाणी अशा अत्याधुनिक सुविधांची व्यवस्था करत आहे. यात मुंबई, कोलकाता आणि नोयडातील आयसीएमआर संस्थांचा देखील समावेश आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button