breaking-newsआंतरराष्टीय

आण्विक आस्थापनांच्या याद्यांचे हस्तांतरण

पाकिस्तान आणि भारत या देशांनी आपापल्या आण्विक आस्थापनांच्या याद्यांची देवाणघेवाण केली. भारत व पाकिस्तान यांच्यात ३१ डिसेंबर १९८८ रोजी आण्विक आस्थापना व सुविधा हल्ला प्रतिबंधक करार झाला होता.  त्यानुसार दोन्ही देशांनी याद्यांची देवाणघेवाण केली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

आण्विक आस्थापने व सुविधा यांची यादी पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयातील प्रतिनिधींना सादर केली. नवी दिल्ली येथे भारतीय आण्विक आस्थापने व सुविधा यांची यादी पाकिस्तान उच्चायुक्तालयातील प्रतिनिधींना सादर करण्यात आली. भारत व  पाकिस्तान यांच्यात आण्विक ३१ डिसेंबर १९८८ रोजी कैदी व आण्विक आस्थापने यांच्या याद्यांची देवाणघेवाण करण्याचा करार झाला होता. त्या कराराची अंमलबजावणी दोन्ही देशांनी २७ जानेवारी १९९१ रोजी केली होती. त्यानुसार दर वर्षी एक जानेवारीला आण्विक आस्थापने व सुविधांच्या याद्यांची देवाणघेवाण केली जाते. १ जानेवारी १९९२ पासून या याद्यांची देवाणघेवाण सातत्याने होत आहे. दोन्ही देशांतील व्दिपक्षीय संबंध खालावलेले असतानाही या प्रक्रियेत खंड पडलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button