breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमहाराष्ट्रराष्ट्रिय

व्हायरल व्हिडीओवर गौतमीची प्रतिक्रिया; म्हणाली, महिला आयोग..

महिला आयोगाने दखल घेतलेलं पाहून बरं वाटलं

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा एका कार्यक्रमात कपडे बदलतनाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर राज्याच्या महिला आयोगाने यांची दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले. व्हायरल व्हिडीओवर गौतमीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमी पाटील म्हणाली की, मला महिला आयोगाबाबात माहिती नव्हती, मात्र त्यांनी दखल घेतलेलं पाहून बरं वाटलं. मी माझ्या वेगळ्याच दुनियेत होते. नंतर मला कळलं की, रूपाली चाकणकर यांनीही या प्रकरणाची दखल घेतली. त्या सोबत आहे हे पाहुन मला खूप छान वाटलं. त्यांनी ताबडतोब कारवाई करा आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा असं सांगितले आहे. त्यामुळे बरं वाटलं.

त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे. मी यावर काहीही बोलू शकत नाही. माझी पोलिसांकडे काहीही मागणी नाही. माझं पोलिसांशी जे बोलणं चालू आहे, ते चालू आहे. मी त्याबाबतीत काहीही बोलू शकत नाही, असं गौतमी पाटील म्हणाली.

मला नेहमीच प्रेक्षकांचं प्रेम मिळत आलं आहे. अजून जास्त प्रेम मिळतंय त्यामुळे आणखी छान वाटतंय. माझी बोलण्याती मनस्थिती नाहीये, तरीही मी तुमच्यासमोर आली आहे. लोक माझ्यासोबत आहेत. या गोष्टीचा खूप अभिमान आहे. आपल्याला लोकांची साथ आहे, यामुळे खूप छान वाटतंय, असं गौतमी पाटील म्हणाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button