breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

सुप्रीया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचे दर्शन घेतलं? विजय शिवतारेंचा गंभीर आरोप

सुप्रियाताईंनी शरद पवारांसाहेबांकडून हिंदू धर्म शिकून घ्यावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. शिवतारे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला आहे. या आरोपानंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असा गंभीर आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी हॉटेलमधील एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओत सुप्रिया सुळे या मी हीच थाळी खाल्ली असं म्हणताना दिसत आहेत. याशिवाय सुप्रिया सुळेंनी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे फोटोही शिवतारे यांनी शेअर केला आहे.

आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन जाऊन दर्शन घेतलं. माग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला, असं कॅप्शन विजय शिवतारे यांनी दिलं आहे.

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, सुप्रियाताईंनी शरद पवारांसाहेबांकडून हिंदू धर्म शिकून घ्यावा. मंदिरात जाण्याआधी मांसाहार करू नये. किंवा मांसाहार करून मंदिरात जाऊ नये. शरद पवारसाहेबांनी पाळलेली ही तत्वे सुप्रीयाताईंनी सुद्धा पाळायला हवी होती. इतका पुरोगामीपणा निदान जाहीरपणे तरी बरा नव्हे, सुप्रियाताई!, असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button