breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

“जगताप कुटुंबियांमध्ये दुमत असण्याचे कारण नाही”; चंद्रकांत पाटील

२७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला कसबा, चिंचवड पोटनिवडणूकांचे मतदान

पुणे : चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून जगताप कुटुंबियांध्ये दोन गट असल्याच्या अफवा गेल्या आठवड्याभरामध्ये शहरच्या राजकारणात पसरवण्यात आली. मात्र जगताप कुटुंबियांमध्ये दुमत असण्याचे कारण नाही, असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. निवडणूक पूर्वतयारी बैठकीला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप आणि चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांनी उपस्थिती लावली होती.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा पक्षाचा प्रयत्न आहे. उमेदवार ठरवण्यासाठीची ही बैठक नव्हती. कोअर कमिटीकडून आणि पार्लमेंटरी बोर्ड यांच्याकडून केंद्रात निर्णय होत असतो. त्यामुळे दोन्ही उमेदवार दिल्लीतून केले जातील. आजच्या या बैठकीत सखोल चर्चा झाली की, इतर पक्षात काय चाललंय? आणि ते काय करणार आहेत? ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणाशी आणि कशी बोलणी करणं अपेक्षित आहे. त्याबरोबरीने गेल्या निवडणुकीत कोणत्या बुथवर कमी मतं होती, त्यात वाढ व्हावी यासाठी काय करता येईल? याबाबत यात चर्चा झाली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे केवळ आमदार नव्हते. ते पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. दहावी, बारावीच्या परिक्षांच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने निवडणूकांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे भाजपाने गाफील न राहता तयारी करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. शक्ती केंद्र आणि बूथ यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. त्याची जबाबदार संघटन सरचिटणीस अमोर थोरात यांच्याकडे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button