breaking-newsपुणे

“मी अटल” एक अभिनव ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न…

  • स्पर्धेची दखल थेट प्रदेश पातळीवर भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पुनम महाजन यांच्या कडून आयोजकांना कौतुकाची थाप…

पुणे | जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने “मी अटल” या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ही स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यात अॉनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या मध्ये सुमारे १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. आयोजकांनी सांगितलेल्या चार विषयांपैकी एका विषयावर भाषण व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्ड करून व्हॉट्सअपवर पाठवायचे होते तसेच स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल होती.

जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले असून सर्व जनजीवन ठप्प झाले आहे. या विषाणूंवर मात करण्यासाठी सर्व देश शर्थीचे प्रयत्न करत आहे. भारतात या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर केले आहे. कोरोना आजाराच्या संकट काळात संपूर्ण देश घरात असताना नागरीकांच्या कल्पनेला एक दिशा देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. ही वक्तृत्व स्पर्धा संपुर्णपणे ऑनलाईन होती स्पर्धकांनी त्यांची भाषणाचा व्हिडिओ व्हाट्सअपद्वारे आयोजकांना पाठवायची होती.


या स्पर्धेसाठी चार विषय आयोजकांकडून देण्यात आले आहे.कोरोना एक वैश्विक महामारी,संघटनेचे महत्व,समर्पित व्यक्तिमत्व,अटलजी एक युगपुरूष, या चार विषयां पैकी एका विषयावर विडियो बनुन पाठवायची होती. या स्पर्धे दरम्यान आयोजकांना अनेक चांगल्या विडियो प्राप्त झाल्या. या स्पर्धेत प्रथमेश रत्नपारखी यांने प्रथम क्रमंक,आशुतोष झा यांने द्वितीय क्रमांक तर आकाश पाटील यांने तृतीय क्रमांक पटकवला.
तर उत्तेजनार्थ म्हणून केदार भेगडे,भक्ती देशमुख,प्रथमेश चव्हाण,शुभम मोटे तसेच प्रमिला धोंगडे यांनी यश मिळवले.

बक्षिसाचे स्वरुप हे प्रथम क्रमांकास ३०००हजार रोख तसेच अॉनलाईन डिजीटल सर्टिफिकेट,द्वितीय क्रमांकास २०००रुपये रोख तसेच अॉनलाईन डिजीटल सर्टिफिकेट,तृतीय क्रमांकास १०००रुपये रोख तसेच अॉनलाईन डिजीटल सर्टिफिकेट .
उत्तेजनार्थ स्पर्धकाला ५००रुपये तसेच अॉनलाईन डिजीटल सर्टिफिकेट व सहभागी प्रत्येक स्पर्धकाला एक अॉनलाईन डिजीटल सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी सहकार्य राज्यमंञी बाळा भेगडे,गणेश तात्या भेगडे,सुदर्शन चौधरी,विशाल घायतडक,सुरज चव्हाण,सचिन लंबाटे,विश्वजित भेगडे यांच्या सह भाजपा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्ह्याच्या पदाधिकार्यांनी केले. तसेच प्रसिद्ध वक्ते बाळाभाऊ खांडभोर यांनी परिक्षक म्हणून भुमिका पार पाडली. स्पर्धेचे आयोजन संस्कार तानाजीराव चव्हाण(उपाध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा) व अनिकेत सुभाष राक्षे(सरचिटणीस भाजपा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा) यांनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button