ताज्या घडामोडीमुंबई

जिल्ह्याच्या लागण दरवाढीचा वसईला फटका

वसई | पालघर जिल्ह्यचा सकारात्मक दर हा जास्त असल्याचा फटका वसई-विरार शहराला बसू लागला आहे. शहराचा रुग्ण सकारात्मक दर ५ टक्कय़ांपेक्षा कमी असला तर पालघर जिल्ह्यचा सकारात्मक दर हा १० टक्कय़ांहून अधिक असल्याने वसई-विरार चौथ्या टप्प्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.ज्या शहराचा रुग्ण सकारात्मक दर हा ५ टक्कय़ांपेक्षा कमी असतो, त्या शहराचा समावेश टप्पा क्रमांक २ मध्ये होतो. वसई-विरार शहर हा पालघर जिल्ह्यत आहे. शहरात करोना रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्ण सकारात्मकतेचा दरही कमी आहे. मागील आठवडय़ात ७५० रुग्ण आढळले होते. एकूण चाचण्या २४ हजार ७०८ झाल्या होत्या. त्यामुळे आठवडय़ाचा सरासरी सकारात्मक दर हा ३.०३ टक्के एवढा होता. पण तरीदेखील टप्पा क्रमांक २ मध्ये शहर जाणार नाही. कारण पालघर जिल्ह्यचा रुग्ण सकारात्मकतेचा दर हा १० टक्कय़ांवर आहे. २६ जून रोजी पालघर जिल्ह्यचा सकारात्मक दर हा १३.८ टक्के तर २७ जून रोजी सकारात्मक दर हा १२.९ टक्के होता. चालू आठवडय़ात हा दर असाच राहिला तर येत्या आठवडय़ात संपूर्ण पालघर जिल्हा टप्पा क्रमांक ४ मध्ये जाण्याचा धोका आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर संपूर्ण पालघर जिल्हा टप्पा क्रमांक ४ मध्ये जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.गुरसळ यांनी दिला आहे. वसई-विरारचा दररोजचा सकारात्मक दर हा दोन ते तीन टक्के असतो. त्यामुळे शहरासाठी स्वंतत्र टप्पा असावा, अशी मागणी वसईतील सामाजिक कार्यकर्ते आणि समाधान फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश कुसे यांनी केली आहे. शहरात व्यापार, उद्योग असून लोकसंख्या ३० लाखांच्या घरात आहे. सर्वाधिक महसूल शहरातून मिळतो. त्यामुळे वसई-विरारवर आणखी निर्बंध नको, असे त्यांनी सांगितले. वसईचा सकारात्मक दर कमी असला तरी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय सकारात्मक टक्केवारी ग्रा धरण्यात येते. त्यामुळे जिल्हयाचा नियम लागू राहील, असे वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी सांगितले. टप्पा क्रमांक ४ लागू झाल्यास कठोर निर्बंध असतील आणि ते दोन आठवडे लागू राहतील.पोलिसांनाही र्निबधाचे काटेकोर अंमलबजावणी होते की नाही ते पाहण्याचे आदेश देण्यात आले आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. आम्हाला ज्या सूचना दिल्या जातात त्यानुसार त्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल, असे परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी सांगितले.

वसईत ६० नवे करोनारुग्ण; चार जणांचा मृत्यू

वसई : वसईत शहरी भागात मंगळवारी ६० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे.आज दिवसभरात ७८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. वसई विरार महापालिकेच्या हद्दीत ६० रुग्ण करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६८ हजार ३३ एवढी झाली आहे. मृतांची आकडेवारी ही १ हजार ४६७ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ७८ रुग्ण करोनातून बरे झाल्याने करोनामुक्त रुग्णांची आकडेवारी ६५ हजार ३८० इतकी झाली आहे. अजूनही १ हजार १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पालघर जिल्ह्यचा सकारात्मक दर हा १० टक्क्य़ांपेक्षा अधिक आहे. तो कायम राहिल्यास पालघर जिल्हा दोन आठवडय़ांसाठी टप्पा ४ मध्ये जाईल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे.

— डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी

शासनाचे नवीन नियमांनसार टप्पे ठरवून दिले आहेत. जिल्ह्यची टक्केवारी ग्रा धरून वसई -विरारचा समावेश टप्प्यांमध्ये केला जाईल.

– गंगाथरन डी., आयुक्त वसई -विरार महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button