TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्रेष्ठ संकल्पातून श्रेष्ठ सृष्टीची निर्मिती होत असते – शिवानी दीदी

पिंपरी : श्रेष्ठ संकल्पातून श्रेष्ठ सृष्टीची निर्मिती होत असते संकल्प ही एक मोठी शक्ती आहे तिचा आपल्या शरीरावर, वातावरणावर प्रभाव होत असतो. कोणताही एक संकल्प जर वारंवार केला तर त्यास सिद्धी मिळत असते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्याख्याता ब्रह्मा कुमारी शिवानी दीदी यांनी केले.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव येथे ”संकल्प से सिद्धी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रह्मा कुमारी उर्मिला दीदी, लक्ष्मी दीदी, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी लक्ष्मण जगताप, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी महापौर उषा ढोरे, पिंपळे गुरव मधील आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी राजकीय धार्मिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहाटे पासूनच गुलाबी थंडीत शिवानी दीदींना ऐकण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी आपली हजेरी लावली होती. शिवानी दीदींची छबी टिपण्यासाठी प्रत्येकाचे मन भारावल्याचे दिसत होते. आपल्या मार्गदर्शनामध्ये पुढे त्यांनी सांगीतले की चिन्ता, भय, यामुळेच स्वास्थ बिघडत चालले आहे, नाते संबंधामध्ये तणाव, कार्यक्षेत्रातील तणाव यावर सकारात्मक संकल्पाने सहज मात करता येते. संकल्पातून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत असते. यावर आपली लाभ आणि हानी होत असते. आपण आपल्या घरातील कचरा रोज साफ करतो पण मनामध्ये अनेक वर्षांपासून अनेकांविषयी नकारात्मकतेचा कचरा साठवून ठेवला आहे. मनातील पीडा दूर केल्या तर शरीराच्या अनेक पीडा आपोआपच कमी होण्यास मदत होत असते. कशीही परिस्थिती आली तरी मनाला कमजोर करू नका त्याला सदैव शक्तिशाली विचारांची सवय लावा. आपला कंट्रोल आपल्याच हातात ठेवा. रोज सकाळी आणि रात्री श्रेष्ठ संकल्पाचा अभ्यास करा. तर ते सिद्ध होताना दिसतील.
लहान मुलांना आपण भाषा शिकवतो तसे सुंदर विचार करण्याची सवय लावा तर ते उद्याचा भविषय घडवेल. अन्नाचा ही आपल्या मनावर प्रभाव होत असतो. जसे अन्न तसे मन बनते यासाठी शुद्ध अन्नाचा स्वीकार केला पाहिजे. मनाच्या शांतीसाठी राजयोग हा उत्तम मार्ग असून तो ब्रह्मा कुमारीजच्या प्रत्येक सेवा केंद्रावर विनामूल्य शिकविला जात आहे. असे अध्यात्मिक मार्गदर्शिका ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांनी शनिवारी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धम्माचार्य संपर्कप्रमुख प्रकाशराव दिसले, शैलेश काळे, शैलेश जोशी, गिरीधारी मतनानी, महेश्वर मराठे, मुकुंद गुरव, संतोष गायकवाड, ब्रह्माकुमारी उर्मिला दीदी, ब्रह्माकुमारी लक्ष्मीदीदी, ब्रह्माकुमारी संगीता दीदी, ब्रह्माकुमारीमनिषा दीदी, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा उज्वला गावडे, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, उषा मुंढे, शोभा आदियाल, वैशाली जवळकर, सविता खुळे, निर्मला कुटे, आरती चोंधे, कल्पना जगताप, उर्मिला देवकर, शोभा जांभुळकर, पल्लवी जगताप, कावेरी जगताप, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, बाबासाहेब त्रिभुवन, सुरेश भोईर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाना शिवले, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेशदादा जगताप, गोपाल माळेकर, गणेश बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते माऊली जगताप, मनिष कुलकर्णी, संदिप नखाते, शेखर चिंचवडे, शशिकांत दुधारे, अमर आदियाल, सखाराम रेडेकर, बाळासाहेब देवकर, विनोद तापकीर, दिलीप तनपुरे यांच्यासह धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button